नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मोटेवाडी शिवारातील डाळिंब चोरी प्रकरणाचा छडा; १.४० लाखांची चोरी उघडकीस, चोरटा अटकेत

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले

पुणे:- शिरूर तालुक्यातील मोटेवाडी शिवारात शेतातून झालेल्या १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या डाळिंब चोरीप्रकरणी शिरूर पोलिसांनी मोठी कामगिरी करत एकाला अटक केली आहे. चोरट्याने १,४०० किलो डाळिंब चोरून नेल्याची कबुली दिली असून, शिताफीने रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी त्याला रांजणगाव परिसरातून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश बशीर काळे (वय २५, रा. सोनसांगवी, ता. शिरूर) असे असून, त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. संदीप दौलत येलभर (रा. मोटेवाडी, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

ही चोरी ७ जुलैच्या संध्याकाळी ५ ते ८ जुलैच्या पहाटे ३ च्या दरम्यान घडली होती. गट क्र. ६८६ मधील शेतातून एमएच १२ वायई ४०२३ क्रमांकाच्या वाहनाने डाळिंब चोरले गेले होते. या प्रकरणात शिंदोडी आणि उरळगाव भागातही डाळिंब चोरीचे प्रकार घडल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली.

शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. तपासादरम्यान, चोरीसाठी वापरलेली दुचाकी ही आकाश काळे याची असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, १४ जुलै रोजी गोपनीय बातमीदाराच्या मदतीने रांजणगाव परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, १६ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विनोद मोरे करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पो.उ.नि. शुभम चव्हाण, पो.ह. नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:16 pm, April 19, 2026
34°C
छितरे हुए बादल
23 %
15 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 41%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!