DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी
उमरेड (२२ जुलै २०२५) :- भाजप युवा मोर्चाचे नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष रोहीत सुधीर पारवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख रुपयांची मदत दिली. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून धनादेश सुपूर्द केला.
राजकारणासोबतच समाजसेवेची नाळ जपणाऱ्या रोहीत पारवे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी दिलेली ही मदत ही केवळ आर्थिक सहाय्य न राहता सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत मिळते, आणि अशा निधीला हातभार लावून एक संवेदनशील समाजभान जपणारे नेतृत्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण रोहित पारवे यांनी निर्माण केले आहे.
याप्रसंगी पारवे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतूनच ही मदत शक्य झाली. रुग्णांना मोफत उपचार मिळून त्यांचे जीवन वाचावे, हीच मनीषा आहे.” त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे त्यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचेही बोलले जात आहे. धनादेश सुपूर्द करताना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
रोहीत पारवे यांच्या या उपक्रमामुळे समाजात संवेदनशील नेतृत्वाची नितांत गरज अधोरेखित होत असून, भविष्यात त्यांच्याकडून समाजोपयोगी कार्य अधिक व्यापक स्वरूपात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



