नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नशेच्या विळख्यात गुरफटली तरुणाई: अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघड, बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:-विलास शिंदोळकर

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार मटका, जुगार, अमली पदार्थाची विक्री करणारे व सेवन करणारे यांची शोध मोहीम सुरूच ठेवणार असून याबाबत उद्यम बाग पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे स्पष्ट केले. मच्छे येथील धाडसी कारवाईत 23 किलो गांजा आणि तिघा पेडलरना अटक केली आहे. आकाश दिलीप जर्मनी वय वर्षे 25, निखिल गोपाळ सोमजीचे वय वर्ष 21, चंद्रया हिरेमठ वय वर्ष 19, तिघे रा. जयनगर मच्छे तालुका बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दहा लाख 10 हजार रुपये किमतीचे 23 किलो 840 ग्राम गांजा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 3 लाख रुपये किमतीची वेरना कार व दोन मोबाईल संच ११०० रुपये रोख अशी एकूण दहा लाख 11 हजार रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
खडेबाजार पोलीस स्टेशनचे ए.सी.पी शेखरप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यम बाग पोलीस निरीक्षक डी. के.पाटील, उपनिरीक्षक किरण वणकट्टी, हवालदार आर. एस. पुजारी टी. बी. कंचनुर,हनुमंत विभूती. आनंद खोत.महेश वाडियार, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की महादेव काशीद आदीनी वरील धाडसी कारवाई केली आहे. उद्यम बाग येथील ए. के. फॅक्टरी जवळ शनिवारी ही कारवाई करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्यांच्या जबानीतून बेळगाव परिसरात पसरलेल्या अमली पदार्थांचे जाळे व त्याची कार्यपद्धती उघड झाली आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
बेळगाव परिसरात विक्रीसाठी हा साठा मागविण्यात आला होता महाराष्ट्रातून गांजा मागवल्याची कबुली या त्रिकूटाने दिली आहे बेळगावला गांजाचा पुरवठा कुठून होतो, मागणी आणि पुरवठा त्याचा ताळमेळ कसा जमवला जातो याची संपूर्ण माहिती जमवण्यात येत असून गांजा नेटवर्कची पाळेमुळे खणून काढण्याचे,कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थांची विक्री,मटका जुगार, अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
नशेच्या व्यापाराविरुद्ध मोहिम, तरुणाईला व्यसनाधीन बनवण्याचे व त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या नशेच्या व्यापाराविरुद्ध मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगतच पोलीस आयुक्तांनी प्रत्यक्ष पालकांनी आपल्या तरुण मुलावर लक्ष ठेवण्याचे भावनिक आवाहन ही केले आहे. आम्ही केवळ गुन्हेगारावर कारवाई करून थांबणार नाही तर शाळा, कॉलेजमध्ये अमली पदार्थांच्या दुष्य परिणामाची जन जागृती मोहीम सुरू करून, प्रत्येक कारवाईनंतर नशेचा बाजार कसा चालतो, बेळगावला कुठून गांजा व इतर अमली पदार्थाचा पुरवठा कसा होतो त्याबाबत संपूर्ण नेटवर्क मोडीत काढून नशा मुक्त बेळगाव व परिसर बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून सर्व नागरिकांनीअशा गैरप्रकाराना विरोध करून अवैध धंद्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:39 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!