DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणेसाठी शरीराविरुध्दच्या गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेवुन त्यांना गुन्हयाचे कामी अटक करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणेकामी सुचना व आदेश दिलेले आहेत.
मा पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी दिले आदेशा प्रमाणे जिल्हयामध्ये दाखल असलेल्या शरीराविरुध्दच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोउनि गळवे व अमंलदार यांची पथक तयार केले होते, पोलीस अधिकारी संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक याचे पथकातील पोलीस अमंलदार वैभव पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे, गु.र.नं. ४८७/२०२५,बी.एन.एस. १०९, ११८(२),११५(२), ३५२,३५१(३),४९,३(५), आर्म अॅक्ट ४, २५, सह मपोकाक १३५ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) मयुर आकाराम पुजारी वय २३ रा बिरोबा मंदीर शेजारी चंदुर २) ओंकार बिरु पुजारी रा तिळवणी ३) शुभम बोरसे रा उदगाव ४) राहुल श्रीकांत कांबळे रा आवळे गल्ली इंचलकरंजी ५) बंडा शिंदे पुर्ण नाव पत्ता माहिती नाही हे आरोपी गुन्हा घडले पासुन फरारी आहेत.
सदर गुन्हयातील आरोपी नामे ओंकार बिरु पुजारी रा. तिळवणी ता. हातकंणगले जि. कोल्हापूर, व राहुल श्रीकांत कांबळे रा. वेताळ पेठ आवळे गल्ली इंचलकरंजी हे दोघेजण आज रोजी तावडे हॉटेल येथुन कर्नाटक येथे पळुन जाणार आहेत अशी गोपनिय माहिती मिळाली. मिळाले माहितीनुसार पोलीस पथकाने तावडे हॉटेल परिसरात सापळा रचुन त्यांना दिनांक २१.०७.२०२५ रोजी सायंकाळी ताब्यात घेतले त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी व त्याचे साथीदारांनी गुन्हा केलेची कबुली दिली. त्यांचे उर्वरित साथीदार यांना देखील लवकरच ताब्यात घेत आहोत. सदर आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक साो योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक साो, डॉ.बी. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक साो आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमक, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अमंलदार वैभव पाटील, शिवानंद मठपती, संतोष बरगे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजु कांबळे, सागर चौगले, महेश पाटील, अरविंद पाटील यांनी केली आहे.



