नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हेरोइन,गांजा विकणाऱ्या दोघांना अटक: हेरोइन पुरविणाऱ्या मुंबईच्या “अम्मा” वर कारवाई.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:-विलास शिंदोळकर

अमली पदार्थाविरुद्ध बेळगाव पोलिसांनी धडक कारवाई सुरूच ठेवली असून हेरोईन व गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी माळ मारूती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सीसीबी व माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
सीसीबीचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी कार्तिक सिद्धप्पा मल्हाडद रा. शिवाजीनगर बेळगाव याला अटक करून त्याच्याकडून 16 ग्रॅम 34 ml हेरोईन जप्त, 520 रुपये रोख रक्कम, एक आयफोन, असे 89 हजार किमतीच्या साहित्य पोलिसाकडून जप्त करण्यात आले आहे.
शिवबसव नगर येथील पी.डब्ल्यू.डी विभागाच्या पडक्या कॉटर्स या ठिकाणी हिरोईन विक्रीसाठी आलेले असताना अचानक छापा टाकून पोलिसांनी कार्तिकला अटक केली आहे. 16 ग्राम 14 मिली इतके हीरोइन आपण मुंबईहून आणल्याची कबुली कार्तिकने दिली आहे.त्यामुळे कोळीवाडा मुंबई येथील संशयित अम्मा या महिलेवर माळमारुती पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 21 बी अन्वये FIR दाखल करण्यात केली आहे.
माळमारुती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीशैल हळुगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मालिकसाब मुकबूलसाब सनदी (26) रा. हिरे्हॉट्टीहोळी तालुका खानापूर या तरुणाला अटक करून त्याच्याकडून 1 किलो 75 ग्राम गांजा, 800 रु रोख व गांजा वाहतुकीस वापरण्यात आलेली मोटरसायकल असे एकूण 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिरे्हॅट्टीहोळी येथील नौशाद मेहबूब सनदी यांनी आपल्याला गांजा पुरविल्याची कबुली मलिक साबने दिली आहे. त्यामुळे नौशाद वरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात एक लाख 38 हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास व पुढील कारवाई पोलीस यंत्रणा करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:04 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!