नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संत गाडगेबाबा कर्मभूमी प्रतिष्ठान च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

स्व. डॉ. एन. टी. डाहेलकर यांना स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमातून अभिवादन.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

मुर्तिजापुर : गेल्या दशकापासून सामाजिक क्षेत्रात आपले योगदान वैराग्यमुर्ती निष्काम कर्मयोगी श्रीसंत गाडगेबाबा यांच्या दससुत्री जिवन संदेशावर देत आपली सेवा समर्पित करणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान व्दारे दि. 24 जुलै गुरुवार रोजी विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून देवी डॉक्टर, मलेरिया, आणि कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून ग्रामीण भागात आपली आरोग्य सेवा देणारे डॉ. एन. टी. डाहेलकर यांचे बालपण अतिशय खडतर गेले असुन त्यांनी बालपणपासूनच आपले शिक्षण पुर्ण करुन आरोग्य सेवेत दाखल झाले. आरोग्य सेवेबरोबरच त्यांनी सामाजिकता ही सदोदित जपल्याचे आपल्या प्रास्ताविकातून अनिल डाहेलकर यांनी सांगताना ते अनेक विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके आणि प्रसंगी अनेकदा बऱ्याच विद्यार्थ्यांची फि देखिल भरत असत आणि त्यांचे हे कार्य अविरत चालावे म्हणून फुल नाही फुलाची फाकळी या जिल्हा परिषद शाळेत या शालेय वस्तू देत असल्याचे म्हणाले.

जि. प. माध्यमिक शाळा मुर्तिजापुर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा. ज. पा. चे वरिष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते कमलाकर भाऊ गावंडे, प्रा. राजकन्या खनखने, श्रीसंत गुणवंत महाराज बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर, डॉ. एन. टी. डाहेलकर स्मृती प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष सुनिल डाहेलकर, मिडिया पत्रकार मो. शब्बीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कमलाकर भाऊ गावंंडे अध्यक्षीय भाषणात डाहेलकर बंधूच्या वडीलांच्या कार्याचा वसा पुढे नेत असल्याने अभिनंदन केले तर बाळासाहेब खांडेकर यांनी डॉ. एन. टी. डाहेलकर यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करताना त्यांचे कुष्ठरोमामुळे तुटलेले संसार जुळविण्याचे कार्य केल्याचे सांगून त्याचे जिवन कार्य मांडले. तसेच प्रा. राजकन्या खनखने यांनी देखिल जिवन कार्य आपल्या भाषनातून सांगितले. सुनिल डाहेलकर यांनी आपल्या आजोबा पंजोबांची श्रीमंती सांगत आजोबांच्या मृत्यू नंतर हलखीत आपले बालपण आणि कष्ठाने घेतलेले शिक्षण घेवून यश प्राप्त केले आणि आरोग्य सेवेत रुजू झाले सांगत विद्यार्थ्यांना कुठल्या ही परिस्थितीत खुप खुप अभ्यास करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पि. डी.धाये सर यांनी तर राजेश ठोंबरे सरांनी आभार मानले. यावेळी सौ. प्रियंका खोकले , किरण राउंडकर, व शिक्षक वृंदासह मो़.जुनैद , गजानन खंडारे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:03 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
22 %
11 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!