(सकाळ समूहाच्या वतीने गौरवगाथा या उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव)
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – मिलिंद इंगळे
अकोला:- रामदास पेठ मधील सेंटर पॉइंट येथे सकाळ समूहाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन एकलव्य इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका रूपाली विनोद पाटील यांना गौरविण्यात आले.
अभिनेत्री स्पृहा जोशी,सकाळ विदर्भ आवृत्तीचे संपादक प्रमोद काळबांडे,सर व्यवस्थापक बेंजामिन रॉक यांच्या हस्ते कर्तबगार व्यक्तींचा परिचय देणारा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
पाटील दांपत्य कानशिवनी या छोट्याशा गावात एकलव्य इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज अठरा वर्षांपासून चालवीत आहेत, त्यांच्या शाळेत उत्तम सुविधा व उत्कृष्ट शिक्षण प्रणाली असल्याने आसपासच्या गावातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी या शाळेला पसंती दिली आहे.
एक वेळ अशी होती की या दांपत्याना संस्था बंद करावी लागणार होती, त्या कठीण प्रसंगी सौ रुपाली पाटील यांनी पुढाकार घेऊन आपल्या लग्नातील दागिने मोडून त्या पैशातून शाळेसाठी जागा घेऊन शाळा जिवंत ठेवली व पुन्हा नव्याने शाळा उभारण्यासाठी सुरुवात केली. अवघ्या वीस विद्यार्थ्यांना घेऊन 2007 मध्ये नर्सरी येथे युकेजी वर्ग असलेली शाळा या दांपत्यांनी चालू केली.
कुठल्या संकटाला ना जुमानता खडतर आव्हाने स्वीकारत जोमाने कार्य सुरू ठेवले.
कोरोना काळात 2020 मध्ये कर्ज वाढल्याने शाळेचे स्वप्न अधुरे राहणार होते, त्यावेळी पण अकोल्यातील आपले स्वतःचे घर विकून शाळेची इमारत पूर्ण केली आणि शाळा त्यांच्यासाठी घर परिवार झाले.
या छोट्याशा गावात शहरीपेक्षाही जास्तीत जास्त सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात हा प्रयत्न सातत्याने ते करत असतात त्यामुळे त्यांच्याकडे हल्ली सहाशे विद्यार्थी आहेत.
या कार्याची दखल घेत सकाळ समूह वतीने व सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे सर व्यवस्थापक बेंजामिन रॉक यांच्यासह सत्कारमूर्ती व इतर मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती.
त्यांचे कौतुक म्हणून जुळलेल्या गावा गावातून, विविध संस्था व संघटना मार्फत शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात येत आहे.



