नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस

१६.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

मिरज :-मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी रात्री बेडग येथे सापळा रचून शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण १६,६१,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये गुटख्याचे विविध प्रकार, एक महिंद्रा थार चारचाकी वाहन, आणि आयफोन १६ प्रो मॅक्सचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मा. कल्पना बारवकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अजित सिद, सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गुरव, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, प्रकाश साळुंखे, प्रविण यादव आणि त्यांच्यासोबतच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
आरोपीची ओळख जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संकेत शिवाजी चव्हाण (वय २०, रा. फनसोफ हायस्कूलजवळ, रत्नागिरी) असे आहे. तो काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या महिंद्रा थार गाडीतून गुटख्याचा साठा घेऊन मिरजमार्गे रत्नागिरीकडे जात असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती.

जप्त केलेला मुद्देमाल:
भगवा सुगंधी तंबाखू – २०८ पाउच, एकूण किंमत ₹२४,९६०/-
व्ही-१ तंबाखू – २०८ पाउच, किंमत ₹६,२४०/-
आरएमडी पान मसाला – २० बॉक्स, किंमत ₹१८,०००/-
एम सेकंड टॅबॅको – २० बॉक्स किंमत ₹१२,०००/-
महिंद्रा थार गाडी – अंदाजे किंमत ₹१५,००,०००/-
आयफोन १६ प्रो मॅक्स (सिम कार्डसह)–किंमत₹१,००,०००/
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – ₹१६,६१,२००/-
कारवाईचा तपशील:
बेडग परिसरात सापळा रचून गाडी थांबवण्यात आली असता चालकाकडे वाहन परवाना, कागदपत्रे आणि मालाची बिले नसल्याचे निष्पन्न झाले. झडती दरम्यान, गाडीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
चौकशीत आरोपीने सांगितले की, हा मुद्देमाल मंगसुळी येथे “माळी” नावाच्या एका व्यक्तीकडून घेतले असून तो रत्नागिरीकडे वाहून नेत होता. यासंदर्भात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गुरव करीत आहेत.

महत्वाचे:
या कारवाईमुळे शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांची तस्करी उघडकीस आली असून, तंबाखूच्या अवैध धंद्यावर मोठा आघात झाला आहे. पुढील तपासात गुटख्याच्या साखळीतील इतर संशयितांची नावेही उघड होण्याची शक्यता आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!