शहापूर इंचलकरंजी येथील दोन आरोपीकडुन ०२ किलो २४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, आरोपी अटकेत
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापुर:- मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार साो, यांनी कोल्हापूर जिल्हयात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करणेबाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना आदेशित करुन कोल्हापूर जिल्हयामध्ये अमंली पदार्थ विरोधी विशेष मोहिम आयोजित केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन अंमली पदार्थांचे तस्करी बाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, आज रोजी तारदाळ येथुन कोरोची मधीनल देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथे दोन इसम त्याचेकडील मोटरसायकलवरुन गांजा या अमंली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंध शााखेकडील शितलकुमार कोल्हाळ सहा. पोलीस निरीक्षक यांना आदेशित केले त्यानुसार शितलकुमार कोल्हाळ यांनी त्यांचे पथकासह कोरोची येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे गाडी अड्ड्याजवळ जाऊन सापळा रचला व छापा कारवाई केली. त्यामध्ये दोन इसमांना त्याचेकडील मोटर सायकलसह ताब्यात घेतले व त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे
१] अरबाज नजीर चौधरी वय २२ रा. आझाद नगर गल्ली नंबर ४ तारदाळ ता हातकंगणले जि. कोल्हापूर
२] नियाज मोहद्दीन मुल्ला वय २२, रा. बिलाल मजीद जवळ आझाद नगर तारदाळ ता. हातकंणगले जि. कोल्हापूर अशी सांगीतली त्यांना ताब्यात घेवुन त्यांची दोन शासकीय पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात ५६,०००/-रुपये किमतीचा ०२ किलो २४० ग्रॅम वजनाचा गांजा व गांजा विक्रीसाठी वापरण्यात आलेला इतर मुददेमाल असा एकुण १,८१,१००/- रु. किमतीचा मुददेमाल मिळुन आला. तो कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करणेत आला आहे. इसम नामे १] अरबाज नजीर चौधरी २] नियाज मोहद्दीन मुल्ला यांना ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द शहापुर पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास शहापुर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, योगेश कुमार साो, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार मा. अपर पोलीस अधीक्षक, आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शितलकुमार कोल्हाळ सहा. पोलीस निरीक्षक, संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अमंलदार, प्रदीप पाटील, वैभव जाधव, वैभव पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजु कांबळे, योगेश गोसावी, गजानन गुरव, अरविंद पाटील, अशोक पोवार, सुशिल पाटील, यांनी केली आहे.



