नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा..

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- विशाल घोक्षे

पुणे: दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात समितीच्या वतीने दिनांक २८ जुलै रोजी नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात अधिकृत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, हवेली क्रमांक ९ येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात महाराष्ट्र नोंदणी नियम १९६४ मधील कलम ४४ चे उल्लंघन करून बनावट भोगवटा पत्रकांद्वारे खरेदीखतांची नोंद करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप समितीने केला आहे.

समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील, माहिती अधिकार प्रदेशाध्यक्ष गणेश घाडगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा संघटक मुन्ना पटेल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही तक्रार दाखल करण्यात आली.

कारवाई न झाल्यास ५ ऑगस्टला आंदोलन
या प्रकरणात २०२३ ते २०२५ या कालावधीत झालेल्या सर्व खरेदीखतांची चौकशी व्हावी, आणि हनुमंत चव्हाण दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांची संपत्ती जप्त करून ती शासकीय तिजोरीत जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जर मुद्रांक विभागाने या तक्रारीवर त्वरित कार्यवाही केली नाही, तर दिनांक ५ ऑगस्ट रोजी जिल्हा निबंधक कार्यालयात “जोडे मारो आंदोलन” करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दिला आहे.

या गंभीर आरोपांची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने कडून व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:53 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!