DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संदिप अहिरे
धुळे :- भीम स्मृती यात्रा २०२५ निमित्ताने काल दिनांक ३१ जुलै रोजी लळिंग – लांडोर बंगला येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ही तीच पावनभूमी आहे जिथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 29, 30 आणि 31 जुलै रोजी 1937 साली मुक्काम केला होता. त्यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या स्मरणार्थ दरवर्षी येथे ‘भीम स्मृती यात्रा’ भरवली जाते, आणि हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे उपस्थित राहतात.
यंदा, ऑल इंडिया पँथर सेना – धुळे जिल्हा युनिटच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार व महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमात 11000 पाववड्यांचे अन्नदान करण्यात आले आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना अनुयायांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.
या अन्नदान उपक्रमासाठी समाज बांधव आणि नेतेमंडळींनी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या योगदानामुळे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवता आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणे, सामाजिक एकजूट निर्माण करणे आणि नव्या पिढीला बौद्धिक प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते, महिला जिल्हा अध्यक्षा अनिताताई सोनवणे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष आकाश भाऊ घोडे, जिल्हा महासचिव आनंद भाऊ अमृतसागर धुळे जिल्हा मार्गदर्शक रत्नशिल दादा सोनवणे, धुळे जिल्हा मार्गदर्शक भानुदास भवरे साहेब जिल्हा उपाध्यक्ष अमर भाऊ सोनवणे, युवा तालुका अध्यक्ष विशाल भाऊ वाघ, धुळे शहर अध्यक्ष योगेश भाऊ बैसाने, युवा तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे, धुळे जिल्हा संघटक राकेश भाऊ बेडसे, धुळे शहर कार्याध्यक्ष संघरत्न भाऊ गायकवाड, धुळे शहर उपाध्यक्ष धुळे शहर संघटक नरेंद्र भाऊ गायकवाड, शहर सचिव भामरे दादा मनोहर भाऊ मस्के, धुळे शहर सचिव जितेश भाई भदाणे, साक्री तालुका युवा अध्यक्ष विशाल भाऊ केदार, धुळे तालुका संघटक सम्राट भाऊ जगदेव, धुळे तालुका युवा संघटक जिगर भाऊ वाघ व आदि पदाधिकारी उपस्थित होते.



