नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दातर्ती शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : साक्री तालुक्यातील दातर्ती गावाचे शिवारात पांझरा नदीचे पात्रात केटीवेअर जवळ एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला असून, साक्री पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत साक्री पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर वृत्त असे की साक्री तालुक्यातील दातर्ती गावाचे शिवारात पांझरा नदीचे पात्रात केटीवेअर जवळ एक अज्ञात पुरुषाचा शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती (दि.१ऑगस्ट) साक्री पोलिसांना समजली. साक्री पोलिसांना तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असता. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचा आढळून आले.

हा मृतदेह पुरुष जातीचा असून, याचा रंग सावळा आहे. तसेच ३५ ते ४० वर्ष दरम्यान असल्याचा अंदाज आहे. याबाबत पोलीस पाटील केवल भदाणे(वय ३९) यांनी पोलीस स्टेशनला कळविल्याने सदर मयतावर इंक्वेस्ट पंचानामा करुन सदर प्रेत कुजलेल्या स्थितीत मिळुन आल्याने सदर प्रेतावर जागीच पोस्टमार्टम करुन अंतविधी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस पाटील महिर गावाचे यांनी खबर दिल्याने अ.मु. रजिस्टरी दाखल करण्यात आली आहे. सदर अ.मु.ची चौकशी पोनि/ दिपक वळवी यांचे आदेशाने घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल बागुल करीत आहेत. अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास साक्री पोलिस स्टेशन फोन न. 02568242333, सहायक पोलिस निरीक्षक अनिल बागुल 9922228004, बीट अमंलदार ASI राजू जाधव 7262896222 यांच्याशी संपर्क करण्याचे आव्हान साक्री पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!