DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अजगर भाई मुल्ला
चाळीसगाव :- इमानदारी आणि सद्भावनेचे उत्तम उदाहरण चाळीसगाव शहरात समोर आले आहे. मिल्लतनगर, हुडको कॉलनी येथील रिक्षा चालक सय्यद शाकीर याकूब यांनी आपल्या रिक्षामध्ये सापडलेली महिला प्रवाशाची बॅग कोणतीही स्वार्थी भावना न ठेवता थेट चाळीसगाव पोलीस स्टेशनला सुपूर्त केली.
सदर महिला सुयेश लॉन्स ते राष्ट्रीय विद्यालय कॉलेजजवळ रिक्षाने प्रवास करत होती. प्रवासानंतर रिक्षामधून उतरताना ती आपली बॅग रिक्षात विसरली. काही वेळानंतर सय्यद शाकीर यांना बॅग आढळून आली आणि त्यांनी त्वरित ती बॅग पोलीस स्टेशनला नेऊन दिली. बॅगेत काही महत्त्वाचे कागदपत्रे व मौल्यवान वस्तू असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रामाणिक आणि समाजप्रेरक कृतीची दखल घेत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी सय्यद शाकीर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सय्यद शाकीर यांची ही कृती आजच्या समाजात इमानदारी, जबाबदारी आणि माणुसकीचा आदर्श घालून देणारी आहे. त्यांच्या या कार्यामुळे रिक्षा व्यवसायात काम करणाऱ्यांच्या बदनामीच्या घटना बाजूला सारून सकारात्मकतेला प्रोत्साहन मिळाले आहे.
या घटनेने शहरात सकारात्मक चर्चा निर्माण केली असून, सर्व स्तरातून सय्यद शाकीर यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.



