नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

त्रस्त महिलेला दिलासा; चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षकांची कौतुकास्पद कामगिरी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला

चाळीसगाव:- एक वर्षापासून माहेरी बसलेल्या महिलेला दिलासा; महिलेने जळगाव येथील महिला तक्रार निवारण कक्षात पती व सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने एक त्रस्त महिला आज ७ ऑगस्ट २५ रोजी ४९८(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकृत पत्र घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आली होती. मात्र, येथे घडलेली सकारात्मक घडामोड ही प्रेरणादायी ठरली.

चाळीसगाव ग्रामीणचे दबंग पोलीस निरीक्षक मा. शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पो. हवा. रवींद्र रावते, पो. हवा. प्रवीण संगिले, पो. नाईक अकरम बेग, व पो. नाईक भगवान माळी या अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना सौम्य, आदरयुक्त संवादाच्या माध्यमातून समजूतदारपणे समजावले. योग्य समुपदेशन करून दोघा कुटुंबांतील गैरसमज आणि तणाव दूर करत, एकत्र येण्यासाठी मार्ग मोकळा केला.

जिथे महिला तक्रार निवारण कक्षात समेट होऊ शकला नाही, तिथे चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मा. शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने संयम, समजूत आणि सामाजिक बांधिलकी दाखवत कौटुंबिक प्रश्न सोडवण्यात यश मिळवले. यावेळी त्रस्त महिला तसेच तिचे माहेरचे आणि सासरचे सदस्य यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

प्रकरणाचा सकारात्मक शेवट म्हणून सदर महिला आपल्या पती व मुलासह सासरी परत गेली असून, ती आपल्या वैवाहिक आयुष्याचा नवा अध्याय समाधानाने सुरू करीत आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या या कौतुकास्पद कार्यामुळे समाजात पोलीस यंत्रणेबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:48 am, April 19, 2026
34°C
कुछ बादल
20 %
19 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 21%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!