नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिक्षण विस्तार अधिकारी लाच घेताना रंगेहात — धुळे ACB ची यशस्वी सापळा कारवाई

⭐१० हजार रुपयांच्या लाचेसह महिला अधिकारी जाळ्यात

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संदिप अहिरे

धुळे (दि. १२ ऑगस्ट) :– लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे युनिटच्या पथकाने पंचायत समिती, धुळे येथील शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे (वय ४३) यांना १० हजार रुपयांच्या लाचेसह रंगेहात पकडले.

तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदे (ता. जि. धुळे) येथे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. दि. ७ ऑगस्ट रोजी नांद्रे यांनी शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचे कारण देत वरिष्ठांना प्रतिकूल अहवाल न सादर करण्यासाठी तसेच समग्र शिक्षा योजनेतील अनुदानातून स्वतःसाठी व शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर यांच्यासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

दि. ११ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता नांद्रे यांनी लाचेची मागणी मान्य केली. त्यानंतर (दि. १२ ऑगस्ट) सापळा रचून पंचायत समिती धुळे कार्यालयातील त्यांच्या कक्षात तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईत पोनि. पद्मावती कलाल, पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो. कॉ. रामदास बारेला, मकरंद पाटील व चालक पो. कॉ. जगदीश बडगुजर यांनी सहभाग घेतला. कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

नांद्रे यांच्या घरझडतीची कार्यवाही सुरू आहे, एक मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ धुळे येथील कार्यालयाशी (दूरध्वनी क्र. ०२५६२-२३४०२०, टोल फ्री क्र. १०६४) संपर्क साधावा.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!