नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड शाळेमध्ये रानभाजी महोत्सव संपन्न..

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- तानाजी भोकरे

महागोंड (ता. आजरा )येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी इयता आठवी ते दहावी मधील विद्यार्थी – विदयार्थिनीनी आपल्या परीसरातील रानभाज्या,ज्यांचा उपयोग औषधी म्हणून व खाण्यासाठी केला जातो अशा आपल्या परीसरातील रानभाज्या गोळा करून शिजवून त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
या प्रदर्शनात मोहर, कुरडूई, भोपळा, नालगी, पाथरी, कडवी, अळू, कांगूणी, काटेली, भांगिरा, आघाडा, काटकुसुंबा या भाज्या शिजवून त्या कशा पद्धतीने केल्या त्याची क्रिया व रेशीपी सांगीतली, त्याच प्रमाणे भाज्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि आजीबाईच्या बटव्याप्रमाणे होणारे औषधी उपयोग, भाज्यामध्ये असणारे विविध पौष्टीक अंश, लोह, कॅल्सिअम फायबर आणि प्रथिनांचा उपयोग सांगीतले.
या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून सौ. समिक्षा आनंदा पाटील, सौ. रेश्मा बाबासाहेब पाटील सौ. शुभांगी भगवान कांबळे, सौ. अनिता सुनिल खराडे त्यांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापक दीपक कांबळे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण २४ विदयार्थी – विद्यार्थीनींनी सहभाग घेतला त्यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक रोहण आळवेकर द्वितीय क्रमांक – समर्थ जाधव, तृतीय क्रमांक . रिषभ पाटील तर उत्तेजनार्थ – अनिकेत कांबळे यांना फुल झाड देवून सत्कार करण्यात आले आणि सहभागी विदयार्थ्याना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यासाठी हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक कांबळेसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून शाळेतील सहाय्यक शिक्षक प्रताप देसाई सर, रविंद्र भोसलेसर, संजीवनी खराडे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थीनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!