⭐रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांना निवेदन.
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी: संदीप सकट
कोल्हापूर:- तुर्केवाडी ता. चंदगड येथील महादेवराव बी.एड. कॉलेज कडून अनुसूचित जातीमधील मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून फी स्ट्रक्चर सोडून वाढीव जादा फी घेतल्याबद्दल अनेक प्रकारच्या तक्रारी समाज कल्याण सहाय्य आयुक्त कोल्हापूर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या होत्या. सतत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची महादेवराव बी. एड कॉलेजकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचे, विद्यार्थ्यांना सतत मानसिक त्रास व आर्थिक फसवणूक करत असल्याची तक्रार आर. पी. आय कोल्हापूर सचिव सतीश माळगे यांच्याकडे देण्यात आली होती. याची दखल घेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांची भेट घेऊन बी. एड. कॉलेज संदर्भात तक्रार देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.तसेच तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, शासनाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत विद्यार्थ्याकडून नियमबाह्य फी वसूल केल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण, फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे माळगे म्हणाले की या कॉलेजच्या तीन वर्षाच्या कारभाराची चौकशी होऊन, संबंधित कॉलेजवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मान्यता रद्द करावी, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आंदोलन, उपोषण तसेच मोर्चे काढण्याचा इशारा सचिव सतीश माळगे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी उपस्थित सचिन मंतेर, संबोधी कांबळे,तक्रार निवारण समिती हातकणंगले, अशोक चव्हाण, गजानन कांबळे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



