नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रोग्रेसिह्व इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वतंत्र दिन उत्साहात साजरा.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- उमेश महाजन

जळगाव :- एरंडोल येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस शाळेचे संस्थाध्यक्ष प्रसाद काबरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर गावात शाळेची भव्य रॅली काढण्यात आली. त्या रॅलीत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतावर खूप सुंदर अस नृत्य सादरीकरण केलं. त्यात लाठीकाठी, झांज,लेझीम तसेच सर्वधर्म समभाव आणि एकत्र कुटुंबाचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केल.भगतसिंग यांचा स्वातंत्र्यासाठीचा प्रेरणादायी प्रवास एका ॲक्ट द्वारे दाखविण्यात आला. ते बघत असतांना गावकऱ्यांचे डोळे पानावले इतकं उभेउभ सादरीकरण विद्यार्थ्यांनी केल. दिनेश काबरे, अनिल काबरे, शंतनू काबरे, गौतम काबरे, यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. कार्यक्रमाची रुपरेषा शाळेच्या उपाध्यक्षा पियुषा काबरे यांच्या नियंत्रणाखाली आखण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वृंद आणि शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मोलाच्या सहकार्याने स्वातंत्र्य दिनाची रॅली यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे शाळेचे संस्थाध्यक्ष प्रसाद काबरे आणि उपाध्यक्षा पियुषा काबरे यांनी सर्वांचे आभार मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!