DPT NEWS NETWORK 🗞️ 🗞️ 📹 ✍️ प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघाच्यावतीने कंजारभाट, सांसी, भेडकूट, छारा, भांतू, सांसिया, कापडियासांसी, कंजर, अडोडिया, मनेश, बैडिया, बांछडा, गुवारिया, पेरना, कबुतरा,बेरड, बेस्तर, भामटा, कैकाडी, कटाबू, बंजारा, राज पारधी, रजपूत भामटा, रामोशी, वडार, कोलाटी, वाघरी, छप्पर बंद, या भटके विमुक्त जाती – जमाती मुक्ती दिन शासनाने जाहीर केलेला आहे. कोल्हापूर, सांगली,सातारा, कराड, शिरोळ व इचलकरंजी सह इतर जिल्ह्यातील सर्व भटक्या जाती -जमाती समाज बांधवांचा एकत्रित येऊन इचलकरंजी शहरातील भाऊसो आरगे सांस्कृतिक भवन येथे 74 वा भटके विमुक्त जाती- जमाती “मुक्ती दिवस” कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात घेणार असल्याचे अ. भा. सं. भां. स. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील मलके यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहाय्यक आयुक्त सचिन साळे, समाज कल्याण अधिकारी सुनिता नेर्लीकर, सहाय्यक संचालक इतर कोल्हापूर मागास बहुजन कल्याणचे अमित घवले, इचलकरंजी उपविभागीय अधिकारी दिपक शिंदे, अखिल भारतीय संहंस्मल भॉंतू समाज संघाचे राष्ट्रीय सल्लागार अॅडव्होकेट रतनलाल कोडेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष अजय इंद्रेकर, राष्ट्रीय युवा अध्यक्ष रणधिरसिंह तंदी, दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनिल दिडा, गुजरात राज्याचे प्रदेशाध्यक्ष दक्षिण छारा कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार आहेत. इचलकरंजी शहरातील व कोल्हापूर जिल्ह्यातील कंजारभाट समाजाचे शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. 31 ऑगस्ट 2025 च्या भटके विमुक्त जाती – जमातीच्या मुक्ती दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुन भटके विमुक्त जाती जमातींच्या करिता मार्गदर्शन व शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजना लोकांच्या पर्यंत पोहचविणे साठी सर्व शासकीय अधिकारी यांनी 31 ऑगस्ट मुक्ती दिनाच्या दिवशी कार्यक्रमास उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे.
यावेळी कंजारभाट समाज शिष्ट मंडळाचे ह.भ.प. विष्णुपंत नेतले, निवास गागडे, नरेश नगरकर, सुरसिंग मिणेकर, गोविंद टिळंगे, दिपक माछरे, उदयचंद गागडे, पप्पु नगरकर, लालसिंग माछरे, प्रकाश मिणेकर, मुकूंद गागडे, गणेश माछरे, सुरjज मिणेकर जयसिंग नेतले, वसंत तमायचे कुमार बागडे, प्रकाश गुमाने विष्णू गुमाने, महेश मछले, निलेश मछले, राहुल मिणेकर सुमित तमायचे सचिन कराळे, कृष्णा मछले, संदेश इंद्रेकर, ओमकार अभंगे सह कंजारभाट समाजाचे शिष्टमंडळांचे मान्यवर उपस्थितीत होते.



