नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राधानगरी पोलिसांची दमदार कामगिरी, अल्पावधित लावला चोरीचा छडा

DPT NEWS NETWORK🗞️ 📹🗞️✍️ प्रतिनिधी : प्रा. नागेंद्र जाधव

कोल्हापूर:- राधानगरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना नोंद करण्यात आल्या होत्या. 31 जुलै, 2025 रोजी सायंकाळी फिर्यादी अक्काताई तानाजी खोत वय 65, रा. चांदेकरवाडी या बाचणी रोडवरून चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकी स्वाराने फिर्यादी खोत यांच्या गळ्यातील 1 तोळ्याचे मणी मंगळसुत्र, 5 ग्रॅम सोन्याचा गुंड असा एकूण 1.35000रु चा मुद्देमाल हिसकावून चोरून नेल्याची तक्रार गु.र. 233/2025 बी. एन. स. 309/4 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरु होता.
त्यानंतर दि. 13 ऑगस्ट, 2025 रोजी दुसरी फिर्यादी रुक्मिणी राऊत वय 72,रा सोन्याची शिरोली या दु. 3 च्या सुमारास जोतिर्लिंग पानशॉप येथे बसल्या असता दोन अनोळखी तरुण दुचाकी घेऊन आले व चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने फिर्यादी राऊत या महिलेच्या गळ्यातील 42000 किमतीचे 6 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र हिसडा मारून चोरून नेले. या दोन वेगवेगळ्या जबरी चोरीच्या घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.त्यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना तपास करून सदर प्रकरणाची पाळेमुळे उकल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पो. हेड कॉन्स्टेबल खामकर, शेळके, पो. अंमलदार किरण पाटील यांच्या तपास पथकाने चांदेकरवाडी, बाचणी परिसर, व सोन्याची शिरोली परिसरातील सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी समीर गजानन मकानदार वय 23,रा उमळवाड, ता शिरोळ याला उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने दोन्ही जबरी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर सार्थक नितीन तिवडे वय 19,रा उमळवाड याला तात्काळ अटक करून इतर सहआरोपीचा शोध सुरु ठेवला.
सदर आरोपीकडून सर्व चोरीचा ऐवज प्राप्त केला असून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील तपास व सह आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले.
सदर कामगिरी यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, उपधीक्षक बी. धीरज कुमार, उप विभागीय अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनानुसार पो. निरीक्षक कळमकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या सहकार्याने राधानगरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गोरे, उप निरीक्षक आकाशदीप भोसले, प्रणाली पवार, कृष्णात खामकर, किरण पाटील, पो. हेड कॉन्स्टेबल शेळके, भोपळे तसेच कागल पोलीस ठाण्यातील युवराज पाटील, कुरणे यांच्या विशेष परिश्रमातून जबरी चोरीचा छडा लागला त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे व पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:46 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!