नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बोरस फाट्याजवळ भीषण अपघात : तरुण चालकाचा मृत्यू, एक जखमी

DPT NEWS NETWORK🗞️📹🗞️✍️प्रतिनिधी:- अजगर भाई मुल्ला

जळगांव:- चाळीसगाव (ता.21 ऑगस्ट) आज सकाळी सुमारास 5 वाजेच्या दरम्यान धुळे- कन्नड मार्गावरील बोरस फाट्याजवळ दोन आयशर गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर गाडी (क्र. MH 20 GZ 1267) वरील चालक सागर ताराचंद चव्हाण (वय 27, रा. सातकुंड, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) याचा जागीच मृत्यू झाला तर एक इसम गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर चव्हाण हा आपली आयशर गाडी (MH 20 GZ 1267) घेऊन धुळ्याहून कन्नडच्या दिशेने जात होता. दरम्यान, त्याच्या पुढे जाणारी आयशर गाडी (MH 15 HH 5331) चालकाने अचानक ब्रेक मारून रस्ता अडवला. त्यामुळे मागून आलेली सागरची गाडी थेट समोरील वाहनावर आदळली.

अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच वाहतूक सुरळीत केली.

सदर प्रकरणी समोरील आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शिंदे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!