DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे/ निवास गागडे
कोल्हापूर:- इचलकरंजी पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल सह वकीलास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी लाच मागणी केली प्रकरणी ताब्यात घेऊन इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली अधिक माहिती अशी की.यातील तक्रारदार यांनी त्यांची फसवणूक केले बाबतची तक्रारी अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी यांचे कार्यालयामध्ये दिला होता. सदर अर्जाची चौकशी पोलीस कर्मचारी सय्यद हे करीत होते. अर्ज चौकशीमध्ये तक्रारदार व गैरअर्जदार यांना सय्यद यांनी बोलावुन घेवुन त्यांचेत मध्यस्थी केली. पोलीस सय्यद व तक्रारदार यांचे ओळखीचे वकील पवन उपाध्ये होते. वकील उपाध्ये यांनी पोलीस अल्ताफ सय्यद साहेब सांगतात त्याप्रमाणे त्यांना पैसे दया म्हणजे ते तुमचे काम करतील तसेच तुमचे कामाकरीता, मी ही पाठपुरावा करतो असे म्हणाले होते. पोलीस सय्यद यांनी तकारदार यांना वकील पवन कुमार उपाध्ये यांचे अकाउंटवर ४०,००० हजार रूपये पाठविणेस सांगितले होते. त्यावेळी तकारदार यांनी नाईलाजस्तव त्यांचे गुगल पे वरून वकील उपाध्ये यांना ४०,००० हजार रुपये पाठविले त्यानंतर वकील उपाध्ये यांनी सदरचे ४०,००० हजार रूपये अल्ताफ सय्यद यांना दिले. तक्रारदार हे अल्ताफ सय्यद यांना भेटले त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना गैरअर्जदार यांनी चेक दिले असुन, सदरचे चेक सय्यद कडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी चेक देण्याची विनंती केली. परंतु सय्यद यांनी ठरलेली रक्कम दिल्या शिवाय चेक देणार नाही असे म्हणून लाचेची मागणी करून सदरची रक्कम वकील उपाध्ये यांचेकडे देणेस सांगितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दिली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली. गैर अर्जदार यांचेकडून तकारवारयांना देणेसाठी चेक घेतले असल्याचे व ते चेक पोलीस सय्यद यांनी स्वतःकडे ठेवून घेतल्याचे तसेच पोलीस सम्मद बांनी तक्रारदार यांना उपाध्ने साहेबांशी बोललो आहे, असे सांगून तक्रारदार यांना वकील उपाध्ये यांचेशी बोलण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी उपाध्ये वकील यांना फोन केला असता, वकील उपाध्ये यांनी पोलीस सय्यद यांचेकडून तक्रारदार यांना चेक घेवून देतो, त्याकरीता पोलीस सय्यद यांचेकरीता तीन लाख रूपये द्यावे लागतील असे म्हणुन तक्रारदार यांचेकडे तीन लाख रूपये लाचेची मागणी केली.
पोलीस कर्मचारी सय्यद हे लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी अल्ताफ हारून सय्यद पोलिस हेड कॉन्सटेबल तत्कालीन नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इचलकरंजी राहणार स्मशानभूमी समोर, शहापुर, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर,पवनकुमार अशोक उपाध्ये, खाजगी वकील, राहणार दिपश्रेम, महालक्ष्मी व्हिलेज, साळुंखे मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांचे विरूध्द इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया चालू असलेचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षीका वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रकाश भंडारे, विकास माने, संदिप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांनी कारवाई केली.



