DPT NEWS NETWORK🗞️ 📹🗞️✍️ प्रतिनिधी: प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर:- चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोवाड येथे दि.15 ऑगस्ट 2025 रोजी, पोलीस ठाणे गु.र.नं 231/2025, बीएनएस कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हयात आरोपीने आपल्या हात चालकीने महालक्ष्मी ज्वेलर्स, कोवाड ता चंदगड येथून 14 ऑगस्ट 2025 रोजी दु. 4.30 वा.च्या सुमारास फिर्यादी पांडुरंग बाबु पाटील व त्यांची पत्नी वैशाली पाटील असे दोघे श्री महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये दागिन्याची विक्री करत असताना लाल रंगाचा टिशर्ट व लालरंगाची पॅन्ट घातलेला एक अनोळखी इसम दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने,हात चालाखी करुन समोरील कॉन्टरवर ठेवलेल्या ट्रेमधील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरी करुन फसार झाला होता. त्यानंतर आरोपीचा शोध घेणे कामी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी तातडीने दोन तपास पथके तयार करुन प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील अनोळखी इसमाचा शोध घेण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने कर्नाटक हद्दीत रवाना केली होती.
त्यानंतर दि. 22 ऑगस्ट रोजी चोरटा बाळाप्पा मायाप्या पट्टनकोडी, रा. वडाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगांव हा बोरगांव (कर्नाटक) येथून एक मालवाहतुक ट्रकमध्ये बसून चिक्कोडी करीता येत असलेबाबत गोपणीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस तपास पथके चिंचणी फाटा, ता. चिक्कोडी येथे दबा धरुन बसले असता एक ट्रक चिंचणीफाटा येथे आला. सदर ट्रक हाताने इशारे करून थांबविण्यास सांगितले असता चोरटा बाळाप्पा मायाप्पा पट्टनकोडी हा ट्रकमधून उडी मारुन पळून जात असताना त्याचा शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेऊन चोरीस गेलेल्या सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक ,कोल्हापूर, मा. अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज यांच्या मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक, श्री विश्वास पाटील, पो. उप. निरीक्षक आकाश भिंगारदेवे यांच्या सह पोहेका ९७० तुकाराम राजिगरे, पोहेकों ३८९ आनंदा नाईक, पोहेका ७२४ अजित वाडेकर, चालक पोहेका २९४ निरंजन जाधव, पोशि ३९२ गोविंद जाधव, चालक पोशि १३३५ युवराज कांबळे, पोशि २४१७ महावीर माणगांवे पोशि१८८० गायकवाड यांनी पार पाडलेली आहे.चंदगड पोलीस ठाणे यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे चोरीचा छडा लागला त्यामुळे त्यांच्या कार्यतत्परचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



