नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत बांधकामातील भीषण अपघात

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍📹 ✍️ प्रतिनिधी – राजेंद्र पवार

मिरज : मिरज शहरात आज दुपारी झालेल्या दुर्घटनेत भिंत कोसळून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. पोलिस व नगरपालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

जखमी मजुरांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत कामगाराचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

बांधकामस्थळी सुरक्षा साधनांचा अभाव असल्याने ही दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुरक्षितता नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने कामगारांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!