DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️प्रतिनिधी – आनंद कांबळे
कोल्हापूर:- कोल्हापूर शहरासह आजु बाजुच्या परिसरात मिरवणुका सुरु असताना रात्री पाचगाव येथील बळवंतनगर मित्र मंडळाची पाचगाव आर के नगर ते पाचगाव जाणारे रोडवरुन गणपती आगमन मिरवणूक सुरु होती. मिरवणुक सहजीवन सोसायटी परिसरात आलेली असताना मिरवणुकीमध्ये ऋषिकेश भोसले रा. पाचगाव हा नाचत होता त्यावेळी रणजित गवळी, चेतन गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांच्या बरोबर किरकोळ वाद झाला. ऋषिकेश भोसले हा मध्यरात्री १.३० चे सुमारास घरी जात असताना रणजित गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांनी त्याचेकडील वॅगन आर कार मधुन येवुन रणजित मोरे याने त्याचेकडील बंदुक घेवुन ऋषिकेश भोसले याचे डोक्याला बंदुक लावुन तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे ऋषिकेष भोसले याने करवीर पोलीस ठाणेमध्ये तक्रार दिली. करवीर पोलिसांनी याबाबत शोध सुरू केला. ऋषिकेश भोसले यास धमकावणारे तिघे इसम बंदुक घेवुन वॅगन आर गाडीतुन पाण्याचा खजिना येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अमंलदार सत्यजित तानुगडे यांना गोपनिय माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे पथकाने सापळा रचुन वैगन आर वाहनासह तीन इसमांना त्याचेकडील बंदुकीसह ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता रणजित राजाराम गवळी वय ३९ रा. सहजीवन सोसायटी पाचगाव, अरुण संभाजी मोरे वय २९ रा. बापुरामनगर कळंबा कोल्हापूर, चेतन राजाराम गवळी वय ३६ रा सहजीवन सोसायटी आर के नगर कोल्हापूर असे असलेचे सांगुन ऋषिकेश भोसले यास त्यांचेतील जुन्या वादाचे कारणावरुन बंदुकीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली असलेची कबुली दिली. तिन्ही इमसांना त्याब्यात घेवुन त्यांचेकडे असलेली विनापरवाना सिंगल बोअर बंदुक, जिवंत काडतुस व गुन्हयात वापरलेली दुचाकी वॅगन आर कार असा एकुण ६,१५,५०० रुपयांचा मुददेमाल कायदेशीर प्रक्रिया करून दोन पंचासमक्ष हस्तगत करून करवीर पोलीस ठाणे येथे मुददेमालसह हजर करण्यात आले. करवीर पोलीस मध्ये तिघांच्यावर गुरनं ५५५/२०२५ बीएनएस १०९,३ [५].११५ [२].३५१ [२] सह आर्म अॅक्ट ५,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार प्रविण पाटील, सत्यजित तानुगडे, दिपक घोरपडे, अरविंद पाटील यांनी केली आहे.अधिक तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहे.



