DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️ प्रतिनिधी:- हितेश शेठाने
मेहकर:- मेहकर नजीक फरदापुरजवळील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्या समोरील समृद्धी महामार्गावर 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ७;१५ मिनिटांनी गाडी चालक व ३ चोरट्यांनी संगनमताने व्यापाऱ्याला चाकू मारून जखमी करून मिरची पावडर फेकून ५ किलोसोने ४,६०,००,००० रुपयांचे सोने चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली असता मेहकर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद करून तपासाचे सूत्र हाती घेतले
व्यापारी अनिल शेषमल चौधरी हल्ली मुक्काम नवी मुंबई व मूळ निवासी राजस्थान येथील असून एम एच ४३ बी यु 95 57 चार चाकी गाडीमध्ये चालक गमेर सिंग मेहकर वरून फरदापुर येथील टोल नाक्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी समृद्धी महामार्गावर चढताच चालकाने गाडी थांबवून मी फ्रेश होतो असे म्हणतात पाठीमागून अज्ञात तीन व्यक्ती आर जे २७टिए९७४२ इनोव्हा गाडीने येऊन त्यापैकी एका व्यक्तीने शेषमल चौधरी यांना चाकूने वार केला असता उजव्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली व अन्य चोरट्यांनी अंगावर तिखट फेकले गाडीचालकाने मालकाच्या ताब्यात असलेली 22 कॅरेट चे ५किलो सोने असलेली बॅग हिसकावून चोरट्याच्या गाडीमध्ये बसून समृद्धी महामार्गाने मालेगाव कडे भरधाव वेगाने धाव घेतली असल्याची फिर्याद मेहकर पोलीस स्टेशनमध्ये दिली असता सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदीप पाटील यांना दिली असता घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले असता मेहकर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 514/25 मध्ये भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 309 (६),३(५) दाखल करून आरोपींना शोधण्यासाठी पातुर व अकोला पोलिसांना कळविले असता त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये नाकाबंदी केली असता पातुर पोलिसांना पातूरच्या जंगलामध्ये चोरट्यांनी चोरीच्या घटनेत वापरलेली गाडी आढळून आली व चोरटे जंगलामध्ये फरार झाले चोरट्यांना शोधण्यासाठी त्यांच्या ताब्यातील ५ किलो ४,६०,००,००० रुपयांचे सोने हस्तगत करण्यासाठी मेहकर पोलिसांनी दोन तपास पथके तयार केले असून फरार चोरट्यांचा शोध घेत आहे या घटनेचा तपास वरिष्ठांच्या व पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप बिराजे, एपीआय अवचार, पीएसआय कड व पीएसआय मिल व अन्य मेहकर पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत चोरीच्या घटनेतील पीडित व्यक्ती मेहकर येथे उपचार घेत आहे वाहनावरील चालक हा श्रीकृष्ण सारखा असावा शकुनी मामासारखा नसावा! यासाठी चालकांची आत्मपरीक्षण करूनच चालक ठेवावा या घटनेनंतर व्यापारी बोलताना दिसत आहे
मेहकर पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे चोरट्यांची गाडी पोलिसांच्या ताब्यात सापडल्याने अधिक तपासाला गती वाढल्याने जनता पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक करत आहे



