नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू

DPT NEWS NETWORK🗞️ 📹🗞️✍️प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

सांगली:- मिरज शहरातील गणेशोत्सवाच्या उत्साहात मोठी दुर्घटना घडली. वडर गल्ली गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते बाबासाहेब कलकुटगी (वय ५०) यांचा मिरवणुकीदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास बाजारपेठ परिसरात ही घटना घडली.

गणरायाच्या आगमन सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी शहरातील सर्व मंडळांनी मोठ्या तयारीसह वाजतगाजत मिरवणुका काढल्या. वडर गल्ली मंडळाच्या मिरवणुकीत कलकुटगी ट्रॅक्टरवर बसून सहभागी झाले होते. यावेळी ते मोबाईलवर मिरवणुकीचे चित्रण करत असतानाच अचानक कोसळले.

जवळील तरुणांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार त्यांना पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता. मिरवणुकीतील तीव्र आवाजामुळे हृदयावर ताण पडल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी पोलिसांनी याबाबत अधिकृत पुष्टी दिलेली नाही.

मुरुम व्यवसाय करणारे कलकुटगी हे परिसरात ओळखले जाणारे व्यक्ती होते. त्यांच्या अचानक निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:32 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!