नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात श्रीगणेश उत्सव निमित्याने तुफानी विनोदी कवितांचा हास्य कल्लोळ

DPT NEWS NETWORK 🗞️📹✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- सिद्धार्थ वानखेडे

मूर्तिजापूर: सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय मूर्तिजापूर व अंकुर साहित्य संघ मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 28/8/2025 गुरुवार रोजी 11:30 वा.”येऊन बसा–अन खदखद हसा” या विनोदी कविता आणि प्रबोधनात्मक काव्य रचना हास्य फवाऱ्यातून विद्यार्थ्यांच्या व प्रेक्षकांच्या समवेत उमटल्या त्याप्रमाणे मोठ्या जल्लोषात सिद्धार्थ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा हास्य विनोदी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय मूर्तिजापूरच्या प्राचार्य मा. अर्चनाताई संजय तायडे मॅडम, उद्घाटक म्हणून सुपरिचित साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते युवाश्री अनिल डाहेलकर होते, तर शेतकरी संघटनेचे नेते काव्य रसिक अरविंद तायडे , कवी ऋषिकेश बोबडे, कवी गायक कल्पक कांबळे यांची हास्य कवी संमेलन मध्ये प्रमुख उपस्थिती होती. तसेच या हास्य विनोदी कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून येवून बसा व खदखद हसाचे निर्माते तथा अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे, फुकट नसीब कार धीरज चावरे, वऱ्हाडी कवी गजानन छबिले ,वऱ्हाडी कवी दिनकर ठाकरे, युवा उद्योजक कवी सुनील लव्हाळे, यांनी आपल्या विनोदी कविता आणि हास्य फुलविणारे किस्यांनी तब्बल तीन तास विद्यार्थी आणि शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी रसिकांना खिळवून ठेवले. कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुर्तिजापूर संस्थेचे संचालक कवी गीतकार मिलिंद इंगळे यांनी थांब रमा थांब ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर सुरेली रचना सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर शाळेच्या शिक्षिका जयश्री शाहाकार मॅडम यांनी आपली कविता आणि चारोळ्या सादर केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज वानखडे सर यांनी केले तर आभार नागदिवे सर यांनी मांडले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!