नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ढवळी गावात सकल मराठा समाजाची ऐतिहासिक रॅली

DPT NEWS NETWORK🗞️ 📹✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी-राजेंद्र पवार

मराठा आरक्षणासाठी गाव एकदिलाने रस्त्यावर; मुंबईतील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला भक्कम साथ

मिरज:- ढवळी (ता. मिरज, जि. सांगली) : मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरातून आंदोलनांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी आज ढवळी गावात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

ही रॅली इतकी प्रभावी आणि उत्साहवर्धक होती की गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक “एक मराठा, लाख मराठा” या घोषणांनी दुमदुमून गेला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजातील एकजूट दाखवून दिली. रॅलीत युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता.

🚩 भगव्याच्या लाटेत न्हालेली ही रॅली ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पोहोचली.

तेथे उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच यांना मराठा समाजाला आरक्षण तातडीने मंजूर करावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

रॅलीत सहभागी मराठा बांधवांनी ठामपणे संदेश दिला की –
👉 मनोज जरांगे यांच्या लढ्याला आम्ही सोबत आहोत
👉 आरक्षणासाठी मराठा समाज एकदिलाने रस्त्यावर उतरला आहे
👉 हक्काशिवाय मागे हटणार नाही

या भव्य रॅलीमुळे ढवळी गावात प्रचंड जनसमुदाय एकवटला होता व मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा प्रभावीपणे दाखवून दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!