नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

देवरवाडीत गणपती देखाव्यातून मराठी शाळेचे प्रबोधन, माझी शाळा माझा अभिमान देखावा सादर.

DPT NEWS 🗞️📹✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव

कोल्हापूर:- देवरवाडी ता चंदगड येथील कुमार विद्या मंदिर देवरवाडी शाळेचे माजी विद्यार्थी विवेक नामदेव कांबळे व त्यांच्या कुटुंबियांनी गणपती उत्सवात आपल्या घरी विद्या मंदिर देवरवाडी शाळेचा देखावा उभा करून मराठी शाळेचे महत्व अधोरेखित केले आहे.
यामध्ये त्यांनी शाळेची गुणवैशिष्टे सांगून शाळेची इमारत, झाडे, मैदान, तैलचित्रे, पेवर्स, रूफशेड, कंपाऊंड, कमान यांचे मॉडेल उभे करताना एकदम सूक्ष्म बारकावे टिपूण शाळेची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. हे करत असताना त्यांची मेहनत, कला कौशल्य,सूक्ष्म निरीक्षण, त्यांनी दिलेला वेळ आणि मराठी शाळेप्रती त्यांची असलेली बांधीलकी स्पष्ट होत आहे.
मराठी शाळा वाचल्या पाहिजेत या हेतूने प्रबोधनपर मॉडेल उभे करून विद्या मंदिर देवरवाडी शाळेचे प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील यश तसेच शैक्षणिक उठावातून शाळेचा झालेला, भौतिक विकासाच्या माध्यमातून होणारा प्रगतीचा आलेख मांडून एक आदर्श शाळा म्हणून शाळेचा गौरव केला आहे.
प्रबोधनातून जाणीव जागृती करण्याचे विवेक नामदेव कांबळे कुटुंबियांचे हे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत.त्यांच्या या गणपती उत्सव प्रबोधनपर कार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक व शिक्षक वृंद देवरवाडी यांनी त्यांचा घरी भेट देवून सत्कार केला आहे. या कटुंबाची शाळेप्रती असणारी कृतज्ञता, अभिमान याबाबत ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
ही आवडते मज मनापासूनी शाळा ।
लाविते लळा जशी माऊली बाळा ॥.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:45 pm, April 18, 2026
40°C
घनघोर बादल
11 %
8 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!