नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

“गणेशोत्सवात पोलिसांचा सन्मान” महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार यांचे आवाहन

DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – मिलिंद इंगळे

शेवगाव :- समाजाच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणारे पोलीस हे खरे “गणरायाचे मानकरी” आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षितता याची जबाबदारी पार पाडताना ते स्वतःच्या कुटुंबापासून व आनंदापासून दूर राहतात. अशा या समाज रक्षकांचा सन्मान करण्यासाठी यंदा गणेश मंडळांनी पोलिसांच्या हस्ते आरती करून त्यांना आदर द्यावा, असे हृदयस्पर्शी आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार यांनी केले.
या उपक्रमासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल भैय्या दुबाले, शेवगाव तालुका अध्यक्ष दिपक मोहिते व सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

विकासभैय्या शेलार म्हणाले “पोलिसांच्या त्यागा मुळेच समाज निश्चिंतपणे सण साजरा करू शकतो. त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आरतीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान झाला तर पोलिस-जनता संबंध अधिक दृढ होतील.”

शेवगाव तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी या आवाहनाचे स्वागत केले असून पोलिसांच्या हस्ते आरती करण्याची तयारी दर्शवली आहे. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल व “पोलीस हेच खरे समाज रक्षक” हा विचार दृढ होईल, असा विश्वास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!