नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बोरकुंड येथे अति प्राचीन रामदेवजी बाबा मंदिरात उत्सव

*भाविकांनी दर्शन आरतीचा लाभ घ्यावा*
*- जितेंद्र जैन बंब*

DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

बोरकुड (ता. धुळे ): येथील जगातील अतिप्राचीन, विश्व द्वितीय नंबर, चमत्कारी लोकदेवता श्री रामदेवजी बाबा भगवान यांचे भव्य दिव्य मंदिर आहे. वर्षातील भाद्रपद महिन्यात सर्वात मोठ्या यात्रा उत्सवाला भेट देऊन लोकदेवता श्री रामदेवजी बाबा यांचे दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामदेवजी बाबा मंदिर रतनपुरा बोरकुडच्या वतीने श्री जितेंद्र जैन बंब यांनी केले आहे.

शेकडो वर्षे पुरातन लोकदेवता श्री रामदेव जी बाबा भगवान यांचे मंदिर बोरकुड येथे स्थित आहे. प्रत्येक दिवसाला उगवणाऱ्या भगवान सूर्यनारायणाचे पहिले किरण या मंदिरात विराजमान असलेल्या श्री रामदेवजी बाबा भगवान यांच्या मूर्तीवर व पादुका पगलीया वर पडते. हे अत्यंत पुरातन आणि चमत्कारीक देवस्थान मानले जाते. साधारण ५०० वर्षांपूर्वी राजस्थानमधील गोटण गावातील बंब जैन कुटुंबातील वडीलधारी मंडळी ज्यांचे वंशज आजही बोरकुंड गावात वास्तव्यास आहेत,या वडीलधाऱ्यांनी रामदेवरा रूणेचा जैसलमेर राजस्थान ते बोरकुंड धुळे महाराष्ट्र अकराशे किलोमीटर लोक देवता श्री रामदेवजी बाबा भगवान यांच्या पगलिया (पादुका) डोक्यावर घेऊन हजारो मैल पायी प्रवास केला होता. कोठेही न थांबता चार जैन बंधूंनी मोठ्या भक्तिभावाने बोरकुड येथे आणून बोरकुड गावात श्री रामदेवजी बाबा भगवान यांचे मंदिर बांधले. बाबाजी पगलिया (पादुका) स्थापना केली. त्या दिवसापासून आजतागायत या अत्यंत प्राचीन मंदिरात भाद्रपद व माघ महिन्यातील दशमीला आणि एकादशीला प्रचंड मोठा यज्ञांचे आयोजन होत आहे.

बरोबर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरीकांच्या वतीने ग्रामदेवता लोकदेवता भगवान श्री रामदेवजी बाबा यांचा म्हणून कित्येक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे, महाआरतीचे, महाप्रसाद व भंडाराचे आयोजन बाबाजींच्या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने केले जाते. या उत्सवात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अनुभव घेतला आहे की, बाबा प्रत्येकाच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात.
शेकडो वर्षापासून एक चमत्कारिक परंपरा परिसरात कितीही दुष्काळ असला, वरूणराजा बरसत नसला,रुसून बसला असेल तरी भाद्रपद महिन्यात ऋषिपंचमीपासून ते भाद्रपद बारस पर्यंत हरिनाम सप्ताहचे आयोजन या मंदिरात लोकवर्गणीतून होत असतो त्यावेळी वरुणराजा लोकदेवता श्री रामदेवजी बाबा भगवान यांना भेटण्यासाठी येतातच ही शेकडो वर्षाची परंपरा आजही चालू आहे, म्हणजे पाऊस येतोच, म्हणून शेतकरी राजा या लोकदेवतेचे सप्ताहाची आतुरतेने वाट पाहत असतो.
“जैसी ज्यारी भावना वैसो तशी पा‍वो!”

या वर्षाच्या महाआरतीला श्री बाबा भक्तांनी ०३ सप्टेंबर २०२५ रोजी, बुधवार सकाळी ११.३० वाजता एकादशीच्या चमत्कारीक महाआरतीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

या महाआरतीला हजारो किलोमीटर दूरवरून हजारो भाविक उपस्थित राहून आपले जीवन धन्य करतात. उत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी बाबा भक्तांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्वांनी उत्सवाला भेट देऊन महाआरतीत सहभागी व्हावे व आपले जीवन सफल करावे,
असे विनम्र आवाहन लोकदेवता श्री. रामदेवजी बाबा मंदिर रतनपुरा बोरकुंडच्या वतीने बाबाभक्त जितेंद्र जैन बंब यांनी केले आहे..
जय बाबारी….🙏

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:56 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!