नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चंदगड पोलिसांची दमदार कारवाई, तब्बल 22 लाखांची गोवा बनावटी दारूसह मुद्देमाल जप्त – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

DPT NEWS 🗞️✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संदीप सकट

कोल्हापूर :- चंदगड मोटनवाडी (ता. दोडामार्ग) येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 22 लाख 54 हजार 880 रुपयांचा गोवा बनावटीचा दारुबंदी गुन्ह्याचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी प्रितेश उल्हास पागम (वय 33, रा. शिवलकर वाडा, मुळगाव पोस्ट आसनोरा, बिचोलीम, नॉर्थ गोवा व सध्या रा. कोनाकट्टा, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग), शिवाजी गावडे (रा. पोर्ले) व उमेश आवडण (रा. तुडये) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी टाटा योध्दा पिकअप (क्र. जीए 04 टी 6600) या वाहनातून महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याच्या हेतूने गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करीत होते. या वाहनामध्ये 13 लाख 54 हजार 880 रुपये किंमतीच्या सिलबंद दारूच्या बाटल्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी मोटनवाडी येथे वाहनास थांबण्याचा इशारा केला असता, आरोपींनी भरधाव वेगात वाहन चालवत पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण केला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या वाहनांना कट मारून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मारुती सुझुकी बलेनो (क्र. एमएच 09 ए के 0929) या कारलाही धडक दिली.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125, 324(2), महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(अ)(ई), 90, 108, 83 तसेच मोटार वाहन कायदा कलम 239/177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार गैंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गेंगजे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!