DPT NEWS✍️🗞️📰🗞️📰✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- रमजान मुलानी
सांगली : जुन्या गुंठेवारी जमिनीचे नियमितीकरण प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना कवठेमहांकाळ येथील मंडळ अधिकारी व कोतवाल लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या कारवाईत रंगेहात सापडले. मंडळ अधिकारी मारुती विलास खोत (४८) व कोतवाल संजय किसन हारगे (४५, रा. विठूरायाचीवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तक्रारदाराच्या आईसह काही नागरिकांनी खरेदी केलेल्या गुंठेवारी जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर प्रक्रिया करून प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी खोत व हारगे यांनी ३५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम २५ हजारांवर ठरली. तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानुसार हारगे यांना पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले व त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, तसेच कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, सीमा माने व वीणा जाधव यांच्या पथकाने केली.



