DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- दि. ९ सप्टेंबर :पेठवडगाव येथील डवरी गल्ली परिसरात झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. या कारवाईमुळे पोलिस दलाचे कौतुक होत असून परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८/०९/२०२५ रोजी रात्री सुमारास १२.२० वा. संभाजी धर्मा सांळुखे (वय ५०) यांचा किरण भिमराव जगताप (वय २५, रा. यादवनगर, कोल्हापूर) याने किरकोळ वादातून रागाच्या भरात डोक्यात लाकडी फळी मारून खून केला व घटनास्थळावरून फरार झाला. मयताच्या पत्नी मिना संभाजी सांळुखे यांच्या फिर्यादीवरून वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४७३/२०२५ भा.द.वि. कलम ३०२(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गंभीर घटनेची दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रमुख मा. योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपीचा शोध घेऊन तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अमलदार सुरेश पाटील व रुपेश माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी परिते गावातील पोकरणेकर वस्तीमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार अत्यंत गोपनीयता व खबरदारी घेत सापळा रचून पथकाने आरोपीस २४ तासांच्या आत ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपी किरण जगताप याने संभाजी सांळुखे यांच्यासोबत झालेल्या शब्दिक वादातून रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी आरोपीस वडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत पोलिस अधीक्षक मा. योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यवाहीत पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, संदीप पाटील व अमित सर्जे यांचा समावेश होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे फरार आरोपीला वेळीच जेरबंद करण्यात यश आले आहे.



