नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्रीत शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू; आई गंभीर जखमी

तीन वाहने धडकल्याने झाला अपघात

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी- साकिब सैय्यद

साक्री – पिंपळनेर रस्त्यावरील साक्री शहरालगत कान नदीच्या पुलावर सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास राज्य परिवहन ची बस व दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले. त्यात तालुक्यातील भाडणे येथील लक्ष्मी दिनेश जयस्वाल (१२ वर्ष) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आणखी एकाची प्रकृती गंभीर होती. जखमींमध्ये मयत मुलीची आई माधुरी दिनेश जयस्वाल ( वय ४०)सह साक्री येथील दोन तरुण जयवंत सूर्यवंशी (३५) व दिनेश पावरा (२५) जखमी झाले. जखमींना साखरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर रित्या जखमी असलेल्या माधुरी जयस्वाल व लक्ष्मी जयस्वाल यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान लक्ष्मी जयस्वाल या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात पोहोचवले असता नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार साक्री कडून पिंपळनेर कडे जाणारी रा.प.ची बस (एम.एच.४० एन.९०१४) व एम.एच.३९ ए.के.८५४६ व एम.एच.१८ बी.वाय.५४३७ या क्रमांकाच्या दोन दुचाकी यांच्यात पुलावरच जोरदार धडक झाली. यापैकी माधुरी जयस्वाल व लक्ष्मी जयस्वाल या आईलेकीला जबर मार बसला व त्या गंभीर जखमी झाल्या. मुलगी लक्ष्मी जयस्वाल हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आई माधुरी जयस्वाल यांची प्रकृतीही अत्यवस्थ आहे. साक्री पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!