नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ॲल्युमिनिअम धातूची तार चोरी करणारी टोळी आळेफाटा पोलिसांनी केली जेरबंद

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले

आळेफाटा:- आळेफाटा परिसरातील बोरी (ता. जुन्नर ) या परिसरात (दि.२७) ऑगस्ट रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर बनकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मुख्यमंत्री सौर कृषी योजना साठी आणलेल्या इलेट्रिक कामाचे मटेरियल AAAC CONDUTOR DOG 100 तारेचे ५ बंडल चोरीला गेल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार (दि. ३१) ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता.

सदर घटनेचा गांभीर्याने तपास करीत असता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी गुन्हे पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या हेतूने सूचना करण्यात आल्या.सदर गुन्ह्याचा शोध घेत असता पथकाला तांत्रिक माहितीच्या व गोपनीय माहितीनुसार सौरभ ओंकार तांगडे (रा. नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे ) व त्याचे साथीदारांनी त्याच्याकडील अल्टो कार व टाटा कंपनीची छोटा हत्ती या वाहनाचा वापर करून गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.तात्काळ घटना स्थळी जाऊन सौरभ ओंकार तांगडे (रा. नारायणगाव, ता जुन्नर, जि. पुणे ) याला ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरण्यात आलेली अल्टो कार( एम. एच.४६एन ६१८६)व टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एम. एच. १२ई क्यु ७२१७) आणि सदर गुन्ह्यातील आरोपी विशाल कैलास सूर्यवंशी (रा. सुलतानपूर ता. जुन्नर जि. पुणे ) यांस ताब्यात घेऊन गुन्हाची चौकशी केली असता. त्यांनी आरोपी विकास देवराम कुऱ्हाडे (रा. सुलतानपूर ता. जुन्नर )तसेच सिद्धेश छबू साळुंखे (रा. सुलतानपूर ता. जुन्नर ) यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमालापैकी ॲल्युमिनिअम तारेचे ५ बंडल अंदाजे रक्कम (५. ५०. ०००)व मुद्देमाल आणि एकूण १२. ५०. ००० रुपयांचा मुद्देमाल सौरभ तांगडे यांसकडून जप्त केला असून बाकीचे आरोपी फरार आहे.

सदरची कामगिरी हि संदीप गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे विभाग, धनंजय पाटील उपविभागीय अधिकारी जुन्नर विभाग, अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हा शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सूचनानुसार पो. हवा.विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, संदीप मालवदे, पो. कॉ. नवीन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, सखाराम जुंबह, प्रशांत तांगडकर यांनी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:55 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!