नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नॅशनल धोबी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी प्राचार्य अनिल मोरे यांची निवड

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

पुणे :- पुणे येथे एकता बहुउद्देशीय संस्था व नॅशनल धोबी महासंघ यांची संयुक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात प्रामुख्याने धोबी समाज आरक्षण व पुणे ते दिल्ली रथयात्रा यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली . चर्चेत महाराष्ट्रातील धोबी समाजातील नामांकित वकील हजर होते त्यांच्या उपस्थितीत आरक्षणासंदर्भात सखोल चर्चा झाली व पुढील वाटचाल कशी करावी याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यात रस्त्यावर उतरून आंदोलन, कायदेशीर आंदोलन व पुणे ते दिल्ली रथयात्रा काढून झोपेत असलेल्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला जागे करून धोबी समाजाचे नवीन महाराष्ट्र निर्मिती अगोदर असलेले एस.सी .चे आरक्षण पुन्हा प्रदान करण्यात यावे व आपली घोडचूक सुधारावी याकरिता दिल्ली येथे संपूर्ण समाज व संपूर्ण संघटना आरक्षणासाठी सन्मानाने एकत्र करून रथयात्रेच्या माध्यमातून मागणी मंजूर करून घ्यावी असे ठरले यावेळी नॅशनल धोबी महासंघातर्फे उत्साही व समाजाविषयी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या समाज बांधवांना नियुक्ती देण्यात आल्या. त्यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पूर्वीचे कार्याध्यक्ष असलेले सेवानिवृत्त प्राचार्य श्री अनिल मोरे यांची त्यांनी केलेल्या शैक्षणिक कला व सांस्कृतिक व युवा यांच्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन नॅशनल धोबी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय अनिलजी शिंदे साहेब व राज परदेशी राष्ट्रीय सचिव व प्रवीण जी धुराटकर राष्ट्रीय संघटन मंत्री प्रोफेसर रजनीताई लुंगसे राष्ट्रीय अध्यक्ष शैक्षणिक विभाग तसेच प्राध्यापक रोकडे सर व सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच ॲडवोकेट क आकाश ज्ञानोबा काळे, ॲडवोकेट टी. आर. पाटील, ॲडवोकेट दळवी यांची राष्ट्रीय कार्यकारणी कायदेविषयक सल्लागार पदी निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्र कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून ॲडवोकेट जगदीश राव कुवर, ॲडवोकेट माने, ॲडवोकेट शिंदे व ॲडवोकेट सकोटे यांची निवड करण्यात आली.
प्रबोधनकार कैलास देवराव खडसान , जगदीश चंद्रकांत सूर्यवंशी प्रभाकर बबनरावजी बुंदेले सरिता किशोर कनोजिया शिवशंकर तराळे जनार्धन हिरवाळकर व असंख्य समाज बांधवांना त्यांच्या अपेक्षित क्षेत्रातील पदे देण्यात आलेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकता बहुउद्देशीय़ संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राध्यापक सांबसकर प्राध्यापक ,प्राध्यापक टाले व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
नॅशनल धोबी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडी बद्दल प्राचार्य अनिल मोरे यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रीय सचिव राज परदेशी राष्ट्रीय संघटन मंत्री प्रवीण जी धुराटकर राष्ट्रीय शिक्षण विभाग अध्यक्ष प्रो. रंजनीताई लुंगसे व मार्गदर्शक प्राध्यापक रोकडे सर सांभास्कर सर टाले सर व उपस्थित सर्व समाज बांधवांचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यांनी आभार मानले व यापुढे अधिक गतीने काम होईल असे आश्वासन दिले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:53 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!