DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- निवास गागडे इचलकरंजी
तेरवाड : ज्ञानभारती एज्युकेशन सोसायटी, कुरुंदवाड संचालित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तेरवाडमध्ये निवासी १४७ व अनिवासी १५३ विद्यार्थिनी /विद्यार्थ्यांना घेऊन शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब यशवंत तिबिले यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुक्ती दिवस आयोजित करण्यात आला. मुक्ती दिन निमित्त शाळेने विद्यार्थिनी/ विद्यार्थ्यांचे हस्तकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, मा. वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद यांचे उपस्थितीत आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व शासकीय योजनाची माहिती या पद्धतीने मेळावा पार पडला.
यावेळी भटक्या विमुक्त मेळावा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना नेते अण्णासाहेब बिल्लारे हे होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक इचलकरंजीचे माजी आरोग्य सभापती नरेश नगरकर, ह भ प विष्णुपंत नेतले, सामाजिक कार्यकर्ते गोविंद टिळंगे, दर्शन पोलीस टाईमचे पत्रकार निवास गागडे, शिक्षक वसंत तमायचे, तेरवाड गावचे माजी सरपंच शशिकला वाडेकर व सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भानुसे यांच्या उपस्थितीत संपन्न करणे आला. सर्व प्रमुख पाहुण्यांनी महामानवांच्या फोटोस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना मुख्याध्यापक बाबासाहेब ताबिले यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. मेळाव्यात भटके विमुक्त मुक्ती दिनाचा इतिहास व मुक्ती दिवसाचे महत्व आश्रम शाळेच्या सचिव माधुरी सावगावे यांनी सांगितले. आण्णासाहेब बिल्लोरे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक व उपस्थित स्टाफ व कार्यक्रमाची स्तुती याबद्दल माजी सरपंच शशिकला वाडेकर यांनी कौतुक केले.शाळेतील भटके विमुक्त गोरगरीब विद्यार्थिनी/ विद्यार्थ्यी यांनी शिक्षणाच्या माध्यमातून शाळेचे व विद्यार्थ्यांचे नाव लौकिक व्हावे याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. इतर पाहुण्यांनी आपापले मनोगत मांडून वृक्षारोपण कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राबविण्यात आला. आरोग्य शिबिराचा कार्यक्रम डॉ. कुमार कदम डॉ. रश्मी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अभिजीत भोसले डॉ. प्रशांत माने, श्रीम. सुप्रिया गुरव, डॉ. वंदना गिरमल, आरोग्य अधिकारी सुभाष यादव, आरोग्य सहाय्यक अनिल गवळी, आरोग्य निरीक्षक अजय भोसले, विजय पाटील, इंद्रराज गोरवे, धनाजी गुहाडे,आरोग्य सेवक दिपाली शिंदे, आरोग्य सेविका सारिका टेळे यांनी आरोग्यशिबिर घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब ताबिले, आभार वाय एस पाटील, सूत्रसंचालक संतोष भुयेकर यांनी केले. यावेळेस शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व परिसरातील नागरिक, भटकेविमुक्त जाती-जमातीचे प्रतिनिधी, सर्व विद्यार्थिनी /विद्यार्थि उपस्थितीत होते.



