नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद – ७ मोटारसायकली हस्तगत, ७ गुन्ह्यांची उघडकी

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – राजेंद्र पवार

मिरज:- मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई करत अट्टल दुचाकी चोरटा अजय बाळासो पटकारे (वय 43, रा. मिचारे गल्ली, सदर बाजार, कोल्हापूर) याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ७ मोटारसायकली, किंमत २ लाख ३० हजार १०० रुपये, हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मिरज शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मकरंद रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गणेशोत्सव व ईद-ए-मिलादसारख्या महत्त्वाच्या बंदोबस्ताच्या काळातही पथकाने सतत तपास सुरू ठेवला.
११ सप्टेंबर रोजी हीरा हॉटेल चौक, मिरज येथे अजय पटकारे हा संशयास्पद दुचाकीसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. चौकशीत त्याने मिरज शहर व परिसरातील एकूण ७ गुन्ह्यांची कबुली दिली.

या कारवाईत खालील गुन्ह्यांचा उलगडा झाला :
मिरज शहर पोलीस ठाणे गुरनंबर 225/2025, 264/2025, 338/2025, 360/2025, 371/2025
तासगाव पोलीस ठाणे गुरनंबर 444/2025
सांगली शहर पोलीस ठाणे गुरनंबर 87/2020
सदर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मकरंद रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:41 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!