नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रानगव्याच्या हल्यात मृत्यू. वनविभागाची कुटुंबाला पाच लाखाचे आर्थिक सहाय्य सुपुर्द.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संदीप सकट

चंदगड:- चंदगड तालुक्यातील कोकरे या गावातील शेतकरी पुंडलिक बापू सुभेदार, वय वर्षे ५६ रा. कोकरे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर हे रामेवाडी ांना शेताकडे सायंकाळी ४.०० ते ४.३० वाजताचे दरम्यान शेतात काम करणा-या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले असता सरस्वती सिताराम सुतार, रा. कोकरे यांचे गट नं. २७ मध्ये ऊसातून अचानक एका रानगव्याने येऊन त्यांचेवर हल्ला करुन त्यांच्या डाव्या कुशीत शिंग घुसवून खोलवर जखम करुन गंभीर जखमी केले. पुंडलिक बापू सुभेदार यांना जखमी अवस्थेत त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल केले. पुंडलिक बापू सुभेदार यांना झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असलेने त्यांचे कुटुंबीयांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे पुढील उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यु झाला. घटनेची वर्दी त्यांचा मुलगा गुरुनाथ पुंडलिक सुभेदार यांनी वनविभागाकडे दिली. त्यानुसार वनविभागाचे तुषार गायकवाड, परिक्षेत्र वन अधिकारी, चंदगड, कृष्णा डेळेकर, वनपाल चंद्रकांत पावसकर कानुर खुर्द आदी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा नोंद केला व त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे जाऊ कुटुंबियांची सात्वंनपर भेट घेतली. वनविभागाचे सहा. वनसंरक्षक, कोल्हापूर विलास काळे यांनी मौजे कोकरे येथे जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक सहाय्य रक्कम रु. २५ लाख मंजूर केलेचे सांगून तातडीची मदत म्हणून मृत व्यक्तीची पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांचे नावे रक्कम रुपये ५ लाख रकमेचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार गायकवाड कृष्णा डेळेकर, वनपाल चंद्रकांत पावसकर, वनपाल कानुर खुर्द गावचे सरपंच कोकरे, पोलीस पाटील, कोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांी वन्यप्राणी दिसताच वन विभागाच्या कार्यालयास तात्काळ कळविण्यात यावे तसेच शेतकाम करत असताना सतर्क व सुरक्षित रहाण्याचा इशारा दिला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!