DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी. प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर:- देवरवाडी ता. चंदगड येथील शेतजमिनीची 7/12 पत्रकी नोंद असलेली श्री वैजनाथ देव इनाम मालकी कोष्टकीतून हटवण्यात यावे, 7/12 उताऱ्यावरील शेतकऱ्यांच्या नावे व त्यांच्या वारसांची नोंद व्हावी यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव व निवेदनाची प्रत कोल्हापूर जिल्हाधिकारी, खासदार शाहू महाराज, गडहिंग्लज प्रांताधिकारी, चंदगड तहसीलदार यांना देवरवाडी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
देवरवाडी गाव हद्दीतील 90% जमिनीवर 7/12 पत्रकी चुकीच्या पद्धतीने श्री वैजनाथ देव इनाम अशी पोकळ नोंद करण्यात आली आहे. त्याला कोणताही आधार नाही.देवरवाडी गाव हद्दीत श्री वैजनाथ देवस्थान आहे परंतु बॉम्बे पब्लिक रजिस्टर पी.टी.आर नुसार गावांतील 24 सर्वे नंबर श्री वैजनाथ देव इनाम म्हणून नोंद आहेत. मात्र इतर 7/12 जमिनीवर श्री वैजनाथ देव इनाम कसे लागले याचा खुलासा करून शेतकऱ्यांच्या इतर सर्व 7/12 पत्रकी तील नोंदीनुसार वारसा नोंदी व्हाव्यात असा ग्रामसभा ठराव मंजूर करून तो सोबत निवेदनाला जोडण्यात आला आहे. सदर जमीन भोगवटा वर्ग 2 म्हणून नोंद असल्याने, व श्री वैजनाथ देव इनाम अशी सरसकट पोकळ नोंद आढळल्याने गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज, शासकीय योजनांचे लाभ, जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे झालेले पीक नुकसान व भरपाई या सर्व गोष्टीना येथील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. या परिसरात कोणतीही नदी, तलाव, कालवा नसल्याने, पावसाच्या पाण्यावरील शेतीवर येथील शेतकरी शेती करतो. शेती हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे असे निवेदनात नमूद करण्यात आहे आहे.
चंदगड तालुक्याचे लोकप्रतिनिधी शिवाजी पाटील यांनी सदरचा विषय सविस्तर समजून घेतला व सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यांनी लागलीच प्रांत कार्यालय गडहिंग्लज येथे उपस्थित राहुन प्रांताधिकारी यांना सदर विषयाची तत्काळ चौकशी करण्यास सांगितले. यावेळी चंदगडचे तहसीलदार, देवरवाडी ग्रामस्थ, उपसरपंच गोविंद आडाव व इतर ग्रामपंचायत सदस्य, शिवश्री.संदीप भोगण, विजय भांदुर्गे, उमेश भोगण, राजाराम करडे, रघुनाथ भोगण, गोपाळ मेघो भोगण, रघुनाथ शिंदोळकर, विनायक मजूकर, दशरथ भोगण, संघर्ष प्रज्ञावंत, ग्रामपंचायत सदस्य बसवंत कांबळे व इतर सदस्य, देवरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.



