नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मित्रांच्या वैयक्तिक वादातून खूनाचा प्रयत्न; राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – संजय दिंडे


आरोपी👆👆👆

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरातील पुईखडी परिसरात मित्रांच्या वैयक्तिक वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन संजय हेरवाडे (वय 27, व्यवसाय – पिठाची गिरणी, रा. दत्त डेअरी मागे, सायबर चौक, कोल्हापूर) हा 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत पुईखडी येथे पार्टी चर्चेसाठी बसला होता. यावेळी त्याच्यासोबत ओम नितीन माने (रा. कळंबा), विनायक रावसाहेब पाटील (रा. लक्षतीर्थ वसाहत) व दोन अनोळखी इसम उपस्थित होते. चर्चेदरम्यान किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला.
वाद वाढताच रोहन हेरवाडे याने ओम माने याला टॉमीने पायावर मारले. हा वाद प्रतिक ओतारी व ऑकार गोंदकर यांनी सोडविला. त्यानंतर रोहन हेरवाडे हा सायबर चौकातील पाण्याच्या टाकीजवळ कार (MH 09 GF 9363) थांबवून खाली उतरत असताना, आरोपी ओम माने, विनायक पाटील व अनोळखी दोन इसम मोटरसायकलवरून आले.
“आमच्या भावाला मारतोस काय?” असे म्हणत त्यांनी रोहनला शिवीगाळ केली. त्यानंतर ओम माने व दोन अनोळखी साथीदारांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी विनायक पाटील याने हातातील कोयत्याने रोहनच्या पायावर, डोक्यात व खांद्यावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याशिवाय रोहनच्या कारवर दगडफेक करून सुमारे 5,500 रुपयांचे नुकसान केले.
जखमी रोहन हेरवाडे याला उपचारासाठी कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्याकडून पोलिसांनी माहिती नोंदविली.
या घटनेवरून राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीएनएस कलम 109(1), 115(2), 352, 324(2), 3(5) सह हत्यार कायदा कलम 5.27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंदन, रशीद शेख व मोकाशी करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:28 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!