DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- उमेश महाजन
अमळनेर : अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबल यांनी तक्रारदार यांच्याकडून दरमहा १५ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. तडजोडीनंतर १२ हजार रुपयांची लाच खाजगी इसमामार्फत स्वीकारत असताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
तक्रारदार हे अमळनेर शहरातील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीतून एलपीजी गॅस सिलेंडरमधून कॉम्प्रेसर मशीनच्या सहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. या व्यवसायादरम्यान अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील (वय ३६, ब.नं. ५३७) व जितेंद्र रमणलाल निकुंभे (वय ३३, ब.नं.१४३२) यांनी “हा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर दरमहा १५,००० रुपये हप्ता द्यावा लागेल, अन्यथा अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखल करू” अशी मागणी केली होती.
तक्रारदारांनी ही बाब २३ सप्टेंबर रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात लेखी स्वरूपात मांडली. प्राथमिक पडताळणीदरम्यान आरोपी कॉन्स्टेबलनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडीनंतर १२ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.
२४ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. त्यानुसार आरोपी अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांनी खाजगी इसम उमेश भटु बारी (वय ४६, रा. फ्लॅट नं. २०४, सहारा टॉवर, लोकमान्य शाळेजवळ, अमळनेर) यांच्या मार्फत तक्रारदारांकडून १२,००० रुपये स्वीकारले. अमळनेर येथील बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वराज्य पान दुकानात ही लाच स्विकारताना सर्व आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींची नावे खालील प्रमाणे
१) अमोल राजेंद्र पाटील, वय ३६, पोलीस कॉन्स्टेबल, ब.नं. ५३७
२) जितेंद्र रमणलाल निकुंभे, वय ३३, पोलीस कॉन्स्टेबल, ब.नं. १४३२
(दोघेही नेमणूक अमळनेर पोलीस स्टेशन)
३) उमेश भटु बारी, वय ४६, खाजगी इसम, रा. फ्लॅट नं. २०४, सहारा टॉवर, अमळनेर
स्विकारलेली लाचेची रक्कम : १२,००० रुपये
गुन्हा नोंद : अमळनेर पो.स्टे. गुरनं./२०२५, दिनांक २४.०९.२०२५
कायदेशीर कारवाई : भ्र.प्र. कायदा कलम ७ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल
सापळा कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
पर्यवेक्षण अधिकारी : सचिन साळुंखे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
सापळा अधिकारी : पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक
पथक सदस्य : यशवंत बोरसे (पोलीस निरीक्षक), पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर
खालील वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले
मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, मा. श्री. माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. सुनिल दोरगे अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र
👉 या कारवाईमुळे लाचलुचपत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चपराक बसली असून स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.



