पिंपळनेरला अवैध सुगंधित स्वीट सुपारी व तंबाखू जप्त; कारवाईत वाहनासह एकूण ६७,२९,२००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी अकिल शहा/ साकिब सैय्यद
साक्री : गुजरात राज्यातून महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू वाहतूक करणारा ट्रक पिंपळनेर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१९) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास जप्त केला. हि कारवाई पिंपळनेर पोलिसांनी गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून केली आहे.
पिंपळनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
दि.१९/०९/२०२५ शुक्रवारी रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. किरण बर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मालवाहतुक ट्रक क्रमांक एम.एच.१८ बी.जी. ३४७३ यामध्ये प्रतिबंधित सुगंधित स्वीट सुपारी व सुगंधित तंबाखू भरलेले असून त्याची वाहतुक गुजरात कडुन दहीवेल मार्गे पिंपळनेर कडुन सटाणा कडे होणार आहे. त्यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक भुषण शेवाळे पोहेकॉ कांतीलाल अहिरे, पोकों / रविंद्र सुर्यवंशी पोकों/पंकज वाघ , चापोकों/दावल सैंदाणे, अशांनी सापळा रचून पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास सदर वाहनाचा शोध घेवून सदर वाहन पकडून त्याची बातमीप्रमाणे पाहणी केली असता त्यामध्ये परच्युटनच्या बॉक्सच्या आड सदर मालवाहतुक ट्रकमध्ये मोठ्या गोण्यामध्ये व लहाण प्लास्टीक पिशवीमध्ये महाराष्ट्र राज्यात वाहतुक, साठा व विक्रीस प्रतिबंधीत असलेला अवैध सुगंधित स्वीट सुपारी व सुगंधित तंबाखू एकूण ४३,६७,२००/- रुपयेची सुगंधीत स्वीट सुपारी व सुगंधीत तंबाखू तसेच संशयीत परच्युटन बॉक्सची किंमत ८,५४,०००/- रुपयांचा व मालवाहतुक ट्रक वाहन एम.एच.१८ बी.जी.३४७३ किंमत १५,००,०००/- रुपयेची असे मिळून आलेले आहे. अशा प्रकारे सुगंधित स्वीट सुपारी व सुगंधित तंबाखू, संशयीत परच्युटन बॉक्स व मालवाहतुक ट्रक असा एकूण ६७,२९,२००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर सुगंधित स्वीट सुपारी व सुगंधित तंबाखू व मालवाहतुक ट्रक वाहनावरील अज्ञात चालकाविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाणे येथे सी.सी.टी.एन.एस क्रमांक २१९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम- १२३,२७४,२७५,२२३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२) (IV) कलम २७(३) (d) कलम २७ (३) (e), कलम ३० (२) (a) कलम ३ (१) (zz) (i) व कलम ३ (१) (zz) (v) चे उल्लंघन कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करुन गुन्हयाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधीक्षक सो श्री. अजय देवरे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री सो श्री. संजय बांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, पोलीस उपनिरीक्षक भुषण शेवाळे, पोहेका / कांतीलाल अहिरे, पोकों/ रविंद्र सुर्यवंशी, पोकों/पंकज वाघ, चापोकों/दावल सैंदाणे, पोकों/पोकों/ सोमनाथ पाटील, पोकों/ संदिप पावरा, पोकों/योगेश महाले, पोकों/ दिनेश माळी, पोकों/ विजयकुमार पाटील अशांनी केली आहे



