नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्रीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा.

DPT NEWS ✍️📰🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री : साक्री शहरात दि.२५ सप्टेंबर २०२५ गुरुवारी रोजी शेतकरी, कष्टकरीच्या विविध मागण्या संदर्भात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वात आदिवासी महिला व पुरुषांचा तहसील कार्यालयावर सत्यशोधक उलगुलान मोर्चा निघाला.
साक्री शहरातील आशापुरी देवी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात करण्यात झाली. शहरातील सुभाष चौक, सतोषी माता चौक, बाजार गल्ली, अहिंसा मार्ग, बस स्थानक रोड, गोल्डी चौक, राष्ट्रीय महामार्गावरून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. तहसील कार्यालयाजवळ सभा घेण्यात आली. कोण म्हणतय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, एकच नारा सात बारा, आदी अशा अनेक घोषणा देत शहर दणाणून सोडले. यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे, वन विभागाचे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी, शेतमजुर स्त्री-पुरुषाच्या सत्यशोधक उलगुलान मोर्चाचे मागण्याच्या निवेदन म्हटले आहे की, आदिवासी वनहक्क कायदा 2006 व नियम 2008 आणि सुधारीत अधिनियम 2012 नुसार अंमलबजावणी करुन सर्वांना 7/12 देणे, आदिवासीवर होणारे हल्ले व अत्याचार थांबवणे, वनविभागाचे वनदावेदारांवर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबवणे,
कापसावरील आयात शुल्क पुर्वी प्रमाणे करावा, दुध, सोयाबीन, तुर, सहीत सर्वपिकांसाठी एम.एस.पी. गॅरंटी कायदा बनवा, शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्ज मुक्त करा,संविधानात्मक आदिवासींच्या आरक्षणात होणारी घुसखोरी बंद करा अशा विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
यावेळी कॉ. करणसिंग कोकणी, कॉ. किशोर ढमाले, कॉ. आर.टी. गावित, कॉ. रणजीत गावित, दिलीप गावित, यशवत माळचे,मेरुलाल पवार, मन्साराम पवार,अश्फाक कुरेशी, शिवदास बागुल,गोरख कुवर, रामलाल गवळी,लालाबाई भोये, काळू अहिरे,जितेंद्र पवार, निलाबाई खडेकर,पवित्राबाई सोनवणे,धाडू माळचे, दिलीप गावित,रमण माळवी, वीर सिंग माळचे,जीवन गावित, दंगल माळचे, राकेश भोसले, दिलीप ठाकरे, निबाबाई ब्राह्मणे, धनजी बागुल, रवींद्र बागुल,शरद पवार,सुशीला राऊत, उत्तम महिरे, धर्म सोनवणे याच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष मोर्चेकरी सहभागी झाले होते.यावेळी साक्री पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दिपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!