नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मूर्तिजापूर येथे भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

DPT NEWS ✍️📰🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – सिद्धार्थ वानखडे

मूर्तिजापूर (जि. अकोला) : जितापूर नाकट ते मूर्तिजापूर दरम्यानच्या रेल्वे पट्ट्याजवळ काल रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव सुरज देविदास खंडारे (वय १९, रा. पंचशील नगर, मूर्तिजापूर) असे आहे. तो आपल्या ताब्यातील टीव्हीएस रायडर मोटारसायकल (क्र. 30 BY 4136) वरून भरधाव वेगाने जात असताना हा अपघात झाला.
फिर्यादी संदेश वामनराव चोरपगार (रा. जितापूर नाकट) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुरजने मोटारसायकल निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवत असताना ती थेट रेल्वे ट्रॅकशेजारील लोखंडी पोलवर आदळली. धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये अ.क्र. 431/25 कलम 106 (1), BNS 281 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
🔹 परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून एक तरुण आयुष्याच्या उमलत्या वयात मृत्यूमुखी पडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!