नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

खंडणीसाठी अपहरण करणा-या आरोपीस पुणे येथुन अटक, निजामपुर पोलीसांची कारवाई.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी अकिल शहा

साक्री : निजामपुर पोलीस स्टेशनला दिनांक ०१/०९/२०२५ रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, पती नामे भावसिग लालसिंग राठोड वय-४० वर्षे धंदा-शेती रा. कढरे ता. साक्री यांस दिनांक ३०/०८/२०२५ रोजी लोणखेडी फाटा ता. साक्री येथून मित्राने पैसे घेतल्याचे कारणावरुन आरोपी नामे प्रविण ओमप्रकाश राठोड याने अपहरण केले होते. यावरुन दिलेल्या तक्रारीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन-२३३/२०२५ भा.न्या.सं.का.-२०२३ चे क. १४०(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा फोनव्दारे अपहरण केलेल्या भावसिंग लालसिंग राठोड याच्या पत्नीकडून दिड लाखाची वारंवार मागणी करुन पैसे न दिल्यास भावसिंग लालसिंग राठोड यास जिवे ठार मारणेच्या धमक्या देत होता. त्या अनुषंगाने आरोपी हे त्यांचा ठावठिकाणा वारंवार अहिल्यानगर, पुणे, कर्जत, इंदापुर याभागांमधे बदलत असल्याने आरोपीचा ठावठिकांबाबत कोणताही सबळ पुरावा नसताना शोध घेणे शक्य होत नव्हते. सदर गुन्ह्याचा तांत्रिक मदतीचे आधारे तपास करुन व सदर निजामपुर पोलीस स्टेशनचे पथक सदर ठिकाणी जाऊन आरोपीताच्या सद्याच्या पत्याबाबत खात्री करुन तसेच माहिती गोळा करुन सदर अपहृतास आरोपी नामे प्रविण ओमप्रकाश राठोड रा. गागरगांव ता. रांजनगाव, जि.पुणे यास दिनांक ०१/१०/२०२५ रोजी निजामपुर पोलीस पथकाने गागरगाव शिवारातील एका शेतातून सिनेस्टाईल पाठलाग करीत ताब्यात घेऊन त्याच्याकडुन केलेल्या चौकशीत संबंधीतास कर्जत तालुक्यातील पाटेगाव शिवारातील शेतात डांबुन ठेवले बाबत माहिती दिल्याने अपह्त भावसिंग लालसिंग राठोड याची तेथुन सुटका करण्यात यथ मिळाले आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे प्रविण ओमप्रकाश राठोड रा. गागरगांव ता. रांजनगाव, जि.पुणे यास अटक करण्यात आली असुन आरोपीतास मा. न्यायालयासमक्ष हजर करुन पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत.

सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/श्री. मयूर एस. भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात. पोउपनि/चंद्रकांत गायकवाड, पोउपनि/मधुकर सोमोसे, पोउपनि/यशवंत भामरे, असई/पाटील (स्थागुशा धुळे), पोहेकॉ/१३६१ प्रदीपकुमार आखाडे, पोहेकॉ/१२५४ नारायण माळचे, पोहेकॉ/४१० आर.यू. मोरे, पोहेकॉ/१३३५ प्रशांत ठाकुर, पोकॉ/१५७९ गौतम अहिरे, मपोकों/पुजा सोनवणे, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/दिपक महाले, पोकों/टिलु पावरा, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकों/श्रीराम पदमर, चापोका/मनोज माळी यांचे पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:03 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!