१ लाख १७ हजारांच्या दरोड्याचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस – सहा आरोपी जेरबंद, रोख रक्कम व मोटारसायकल जप्त
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – महेश देवरे
धुळे : धुळे तालुका पोलीसांनी अवघ्या २४ तासांत मोठी कामगिरी करून तब्बल ₹१,१७,०००/- च्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणत सहा आरोपींना जेरबंद केले. यामध्ये गुन्ह्यातील रोख रक्कम व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील :
तक्रारदार खुशल मोतीराम पाटील (वय ३२, व्यवसाय- संगण मॅनेजर, रा. मुद्राणी, ता. पारोळा, जि. जळगाव) हे दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी बचत गटाची रक्कम गोळा करून खोरदड तांडा येथे जात असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास शिरुड-खोरदड रोडवर त्यांना सहा जणांनी अडवून मारहाण केली व ₹१,१७,०००/- रोख रक्कम लुटून नेली. याप्रकरणी तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्र. ५९१/२०२५, भा.दं.सं. कलम ३१०(२), १२६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांची जलद कारवाई :
प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व शिरुड दुरक्षेत्राचे पोउनि कृष्णा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तक्रारदाराच्या दिलेल्या वर्णनावरून व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पुढील आरोपींना ताब्यात घेतले :
१) पंकज अशोक सोनवणे (२५)
२) दिपक लक्ष्मण भिल (१९)
३) माणिलाल सुकदेव भिल (२८)
४) विनोद हिम्मत भिल (२१)
५) सचिन मोहन भिल (२०)
६) योगेश उत्तम भिल (२७)
(सर्व रा. बाबरे, ता. जि. धुळे)
कबुलीजबाब व जप्ती :
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या घरी छापा टाकल्यावर पोलिसांना ₹८०,७००/- रोख रक्कम, तसेच गुन्ह्यात वापरलेली ₹५०,०००/- किंमतीची बजाज पल्सर मोटारसायकल मिळून आली. एकूण ₹१,३०,७००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस दलाचा सहभाग :
ही कारवाई पोनि. धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अन्वेषण अधिकारी पोउनि कृष्णा पाटील व त्यांच्यासोबत पोहवा ललित खळगे, प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाठ, पोकॉ जयेश बावीस्कर, दिपक मोहिते, संदीप गुरव, राहुल देवरे यांनी संयुक्तरीत्या केली.
न्यायालयीन कार्यवाही :
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.
👉 धुळे तालुका पोलिसांच्या या तात्काळ व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.



