नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बळसाणे येथील घरफोडी उघडकीस; ६ तोळे सोने व लाखोंचा ऐवज जप्त ; निजामपुर पोलीसांची धडक कारवाई.

DPT NEWS✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी अकिल शहा

साक्री : निजामपुर पोलीस स्टेशनला दि. २१/०९/२०२५ रोजी फिर्यादी शांताराम गोरख पाटील रा. बळसाणे ता. साक्री यांनी तक्रार दिली की, दिनांक १८/०९/२०२५ सकाळी ०७.०० ते दिनांक १९/०९/२०२५ रोजी सायंकाळी १६.०० वाजेच्या दरम्यान फिर्यादी हे धार्मीक विधीसाठी नाशिक येथे गावाला गेले असल्यामुळे बळसाणे गावातील त्यांचे बंद असलेले घराचा दरवाजा उचकटुन घरफोडी केल्याच्या कारणावरुन दिलेल्या तक्रारीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन गुरन-२५२/२०२५ भा.न्या.सं.का.-२०२३ चे क.३०५,३३४(१),३३१(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरच्या गुन्हयात कोणताही सबळ पुरावा नसतांना मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशांन्वये सपोनि/मयुर भामरे यांनी गुप्तबातमीदारांच्या मार्फत व ईतर तांत्रीक पुराव्याच्या अभ्यास करुन सदर गुन्ह्यामधे आरोपी नामे १) अजय बापु कोळी, २) मुकेश पावबा धनगर३) दिपक पंडीत शिरसाठ, सर्व रा. बळसाणे ता. साक्री जि. धुळे यांनीच सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न केले. सदर आरोपी हे मुंबई येथुन परत येत असतांना रायपुरबारी येथे नाकाबंदी करुन त्या ठिकाणी सदर आरोपींचा दिनांक ०१/१०/२०२५ रोजी रात्री ०२.०० वाजेला गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकलसह पकडण्यात यश आले होते. त्यानंतर त्यांच्या सोबतचा ईतर आरोपीचे नाव निष्पन्न करुन त्यालाही सदर गुन्ह्यामधे दिनांक ०१/१०/२०२५ रोजी रात्री ०३.०० वाजेला अटक करण्यात आली. सदर आरोपीतांना विचारपुस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यांतील आरोपीतांना मा. न्यायालयासमोर हजर करुन मा. न्यायालयाने सुरुवातीस ०२ दिवस व नंतर ०३ दिवस असे एकुण ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. सदर पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीतांनी गुन्ह्यात घरफोडी करुन चोरी नेलेले ६ तोळे सोने हे बृहमुंबई येथुन निजामपुर पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यात रोख रक्कम, ६ तोळे सोने व इतर असा एकुण ४,२९,०००/-रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. मा. अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/श्री. मयुर एस. भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/चंद्रकांत गायकवाड, पोउपनि/मधुकर सोमोसे, पोउपनि/यशवंत भामरे, असई/पाटील (स्थागुशा धुळे), असई/रुपसिंग वळवी, पोहेकॉ/प्रदीपकुमार आखाडे, पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकॉ/आर.यु.मोरे, पोहेकॉ/प्रशांत ठाकुर, पोकॉ/दिपक महाले, पोकॉ/राकेश बोरसे, पोकों/गौतम अहिरे, पोकॉ/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/शरद पाटील, पोकॉ/टिलु पावरा, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकॉ/श्रीराम पदमर, चापोकों/मनोज माळी यांचे पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:04 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!